केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय

शरीरात होणाऱ्या हार्मोन्स बदलांमुळे, आहारामध्ये पुरेश्या पोषक घटकांच्या अभावामुळे, मानसीक ताणतणाव, क्षारयुक्त पाण्याने केस धुतल्याने केस गळायला लागतात. म्हणूनच आज आम्ही आपल्याला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने आपण केस गळणे थांबवू शकाल.

केस गळण्याची मुख्य कारणे आपण वरती जाणून घेतलीच आहेत त्यामुळे आपली केस नक्की कोणत्या कारणामुळे गळत आहेत त्यानुसार आपण त्यावर उपाय करु शकता.

क्षारयुक्त पाण्याने केस धुतल्याने केस गळत असतील तर आपण केस धुण्यासाठी तसे पाणी वापरणे थांबवले पाहिजे, यासोबतच केस धुण्यासाठी आपण जो शाम्पू वापरता तो नैसर्गिक घटकापासून बनलेला असावा.

त्यामध्ये केमिकल मिसळलेले असतील तर शाम्पू देखील बदलणे गरजेच आहे. पूर्वी स्त्रिया शिकेकाई, रिठा अशा गोष्टींचा केस धुण्यासाठी वापर करायच्या त्यामुळे त्यांचे केस अगदी म्हातारपणा पर्यंत टिकून राहायचे.

शरीरात होणाऱ्या हार्मोन्स बदलांमुळे थायरॉइड विकारांमुळे जर आपले केस गळत असतील तर आपण सर्वप्रथम आपण स्वताला चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत जसे कि रात्री जागरण करणे थांबवल पाहिजे.

पुरेस पाणी प्यायल पाहिजे, तेलकट, मसालेदार, मैदायुक्त पदार्थ खाण थांबवल पाहिजे, आहारात ताक, दही अश्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे. पचायला हलका आहार घेतला पाहिजे.

मानसीक ताणतणावामुळे केस गळत असतील तर आपण सर्वप्रथम कोणत्या हि गोष्टीचा अतिविचार करणे थांबवले पाहिजे, बऱ्याचदा मानसीक ताणतणाव हे एकाच गोष्टीचा अतिविचार केल्याने येत असतात.

चांगल्या सवयी स्वताला लावल्याने मानसीक ताणतणाव कमी करता येईल; जसे कि नियमीत सकाळी योगासन, व्यायाम करणे, मनशांती साठी प्राणायम करणे, ध्यानधारणा करणे अशा गोष्टी केल्याने मन शांत होईल आणि तणाव कमी होईल.

या शिवाय केस गळणे कमी करण्यासाठी आपण नारळाच्या तेलाने केसांची मालिश करू शकता. केस सारखे बांधून ठेवल्याने केसांना घाम येतो त्यामुळे दिवसातून काही वेळ केस मोकळे सोडा, केस धुण्यासाठी नैसर्गिक घटक असलेल्या शाम्पूचा वापर करा. आपल्याला केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page