केस गळणे थांबवण्यासाठी उपाय

अपुरी झोप, ताण तणाव, क्षारयुक्त पाण्याने केस धुतल्याने, धूळ, माती, केसांमध्ये गेल्याने, प्रदूषण, शरीरात होत असलेल्या हार्मोन बदलांमुळे आपले केस गळू लागतात; तसेच अनुवंशिकतेमुळे देखील केस गळू शकतात. म्हणूनच आज आपण केस गळणे थांबवण्यासाठी उपाय जाणून घेणार आहोत.

केस गळणे थांबवण्यासाठी आपण मेथी दाण्यांचा वापर करू शकता. मेथीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात जे केसांची वाढ वाढवण्यास मदत करतात. यासाठी मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.

दुसऱ्या दिवशी मेथीचे दाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस आणि खोबरेल तेल मिसळा. ही पेस्ट केसांच्या मुळांवर लावा. ते कोरडे होईपर्यंत केसांवर राहूद्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. काही दिवसात तुम्हाला ह्या उपायाचा परिणाम दिसू लागेल.

केस गळणे थांबवण्यासाठी केसांना तेलाने मसाज करणे खूप महत्वाचे आहे. केसांना आणि टाळूला तेलाने व्यवस्थित मसाज केल्याने केसांच्या मुळांशी रक्ताचा प्रवाह वाढतो. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात, त्यामुळे केस गळणे हळूहळू कमी होऊ लागते.

केस धुण्याआधी खोबरेल तेलाने मालिश केल्याने केस मजबूत होतात. केस गळणे थांबवण्यासाठी कांद्याचा रस गुणकारी आहे. कांद्याच्या रसामध्ये सल्फर असते केसांच्या मुळाशी कांद्याचा रस लावल्याने केस गळणे थांबायला मदत मिळते.

केस गळणे थांबवण्यासाठी आवळ्याचे तुकडे करून उन्हात वाळवा. ते चांगले सुकल्यावर खोबरेल तेलात काही तुकडे टाकून चांगले उकळा.हे तेल थंड झाल्यावर साठवून ठेवा आणि केसांना लावा. ह्या उपायाने केसांची वाढ चांगल्याप्रकारे होते तसेच केस मजबूत होतात केस गळणे थांबायला मदत मिळते.

आपल्याला केस गळणे थांबवण्यासाठी उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ चा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page