केस दाट आणि मुलायम करण्यासाठी घरगुती उपाय

स्त्रियांना आपले केस लांब, काळेभोर,दाट, मुलायम असावे अस वाटत असत; केस चांगले दिसावेत यासाठी आपल्यापैकी बऱ्याच स्त्रिया केमिकल युक्त तेल, शाम्पूचा वापर करतात, काही स्त्रियांचे केस त्यामुळे चांगले देखील होतात मात्र बऱ्याच स्त्रियांना हि केमिकल युक्त प्रसाधने सूट होत नाही अन त्यांचे केस गळू लागतात.

केस गळण्याचे सगळ्यात पहिलं कारण हेच असत या व्यतिरिक्त आंघोळ करण्यासाठी आपण जर जादा क्षार असलेले पाणी वापरल तर त्यामुळे देखील केस गळू शकतात. जादा क्षार असलेले पाणी वापरल्याने केसांची नैसर्गिक चमक निघून जाते.

जर आपण पुरेसा पोषक आहार घेत नसाल, पुरेसे पाणी पित नसाल, मानसीक तणावात असाल, व्यवस्थित आणि पुरेशी झोप घेत नसाल तर आपले हि केस हळू हळू विरळ होऊ शकतात.

म्हणूनच हि माहिती आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, यामध्ये आपण केसांची योग्य प्रकारे काळजी कशी घ्यायची हे जाणून घेणार आहोत.

आपले केस प्रमाणापेक्षा जास्त गळत असतील तर सर्वप्रथम त्याचे कारण शोधा वरती दिलेल्या गोष्टी पैकी एखाद्या कारणामुळे आपले केस गळत असतील तर वेळीच त्यागोष्टीवर काम करायला सुरुवात करा.

केसांची वाढ होत नसेल तर याचे कारण केसांच्या मुळाशी फाटे फुटणे हे असू शकत. केसांच्या मुळाशी फुटलेले फाटे घालवण्यासाठी केस अगदी थोडे ट्रिम करा. ट्रिम केल्यामुळे केसांना फाटे फुटले असतील तर ते निघून जाऊन केसांची वाढ होईल.

आपले केस लांब, काळेभोर,दाट, मुलायम करण्यासाठी नियमित केसांच्या मुळावर कोरफड गर लावा. 30 मिनिटे राहूद्या नंतर कोमट पाण्याने केस धुऊन टाका. कोरफड गरामध्ये आपल्या केसांसाठी आवश्यक असणारे पोषक तत्व असतात; त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

आपले केस लांब, काळेभोर,दाट, करण्यासाठी अंड्याचा बलक एका वाटीत घ्या त्यामध्ये दोन चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळून हे मिश्रण हातांमध्ये ग्लोज घालून डोक्याला मसाज करा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केल्याने आपल्याला याचा नक्की फायदा होईल.

केस लांब, काळेभोर,दाट, करण्यासाठी आपल्या आहारात आवळ्याचा समावेश करा रोज एक आवळा खाल्ला तर आपले केस काळेभोर राहतील आवळा तेल केसांना लावल्याने देखील आपल्याला चांगला परिणाम दिसू शकतो.

आपल्याला केस दाट आणि मुलायम करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page