सातारा जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेला ”केंजळगड”

सातारा जिल्हा म्हंटल की अनेक गड किल्ले डोळ्यासमोर उभे राहतात. कृष्ण आणि वेण्णा या नदी संगमावर वसलेले हे शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. साताऱ्यावर सातवाहन, चालुक्य, शिलाहार, देवगिरीचे यादव, बहमनी, मुस्लिम राजकर्ते, मराठा राजकर्त्ये यांनी राज्य केले.

याच जिल्ह्यात एक किल्ला कृष्णा आणि नीरा या नद्यांच्या खोऱ्यात उभा आहे, साताऱ्याच्या निसर्ग सौंदर्याने नटलेले हा किल्ला म्हणजे ”केंजळगड”. या किल्ल्याची चढाई मध्यम असून हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारात येतो. या किल्ल्याच्या जवळ रायरेश्वराचे पठार आहे.

या किल्ल्याची निर्मिती बाराव्या शतकात झाली. राजा भोज याने या किल्ल्याची उभारणी केली. हा किल्ला इ.स. १६४८ मध्ये अतिलशहाच्या हाती आला, ज्यावेळी महाराज चिपळूणमध्ये आले, तेव्हा त्यांनी केंजळगड घेण्याचे ठरवले.

त्यावेळी या किल्ल्याचे किल्लेदार होते, गंगाजी विश्वसराव किरदत. हा मराठी सरदारांकडून मारला गेला आणि अखेर हा किल्ला १६७४ मध्ये स्वराज्यात सामील झाला.

पुन्हा हा किल्ला औरंगजेबाकडे गेला, परंतु हा किल्ला जास्त काळ त्याच्याकडे राहिला नाही. मराठ्यांनी पुन्हा गड जिंकला. मराठ्यांनंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

हा किल्ला अल्हाददायी निसर्गाच्या सानिध्यात असल्याने गड फिरण्यास उत्सुकता वाटते. या किल्ल्याचे खास वैशिट्य असे की किल्ला चढून वर गेल्यानंतर एक भलामोठा सुळका दिसतो, हा वर चढण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या नजरेस पडतात. नवख्या ट्रेकर्सनी मार्गदर्शकांच्या मदतीने हा सुळका चढावा.

या गडावर गुहा, पाण्याचे टाकं, पाण्याचे मोठे तळे, गडाला काही ठिकाणी तटबंदीने वेढलेले आहे, इमारतीचे भग्न अवशेष, चुन्याचा घाणा, या घाण्याच्या पुढील बाजूस एक पडके मंदिर असून हे मंदिर केंजाई देवीचे आहे. आत देवीची मूर्ती दिले, अशा बऱ्याच पडझड झालेल्या वास्तू या गडावर पाहायला मिळतात.

हा किल्ला सातारा शहरापासून सुमारे ६४ किलोमीटर दूर आहे. किल्ल्यावर वाईमार्गे जाण्यासाठी रस्ता आहे. यामार्गे तुम्ही वाईहून खावली या गावामध्ये येऊ शकता. इथूनपुढे १० ते १५ मिनिटांची चढाई लागते.

त्यानंतर एक वस्ती दिसेल, येथून कच्या वाटेने गडावर पोहोचता येते. या किल्ल्यावर पावसाळ्यात निसर्गाची एक वेगळीच किमया झालेली पाहायला मिळते, परंतु अशावेळी गडावर जाताना खबरदारी घ्यावी.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा. महत्वाची टीप: हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page