कुकर हा आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचे भांडे आहे. कुकर शिवाय आपण स्वयंपाकघरात अन्न शिजवण्याचा विचार हि करू शकत नाही. कुकरमध्ये अन्न लवकर शिजते आणि गसची बचत होते म्हणून जवळपास प्रत्येक गृहिणी आपल्या घरी कुकरचा वापर करते.
प्रत्येक गृहिणीला वाटत असत आपल्या घरातील भांडी चकचकीत असावीत स्वच्छ असावीत. मात्र आपण जे जेवण बनवतो त्यासाठी आपण मसाले, तेल याचा वापर करतो जे कधीकधी कुकरला चिकटून राहत, तेव्हा ते साफ करणे खूप कठीण आणि खूप कष्टाचे बनून जाते, कधी कधी कुकर मध्ये कमी पाणी टाकल्यामुळे भाजी करपते. अशा वेळी आपण ह्या सोप्या टिप्स वापरून आपला कुकर चकचकित करू शकता.
जळलेला कुकर साफ करण्यासाठी प्रेशर कुकरमध्ये पाणी भरा आणि मंद आचेवर 10 मिनिटे उकळा. कुकर थंड झाल्यावर त्यात 2 चमचे डिशवॉशिंग लिक्विड टाका आणि घासून स्वच्छ करा. यामुळे सर्व काळे डाग आणि जळलेल्या खुणा दूर होतील.
प्रेशर कुकर स्वच्छ करण्यासाठी आपण कांद्याच्या सालींचा वापर डाग साफ करण्यासाठी करू शकता. यासाठी कुकरमध्ये पाणी भरून त्यात ४-५ कांद्याची साली टाका. त्यानंतर कुकर झाकून 20 मिनिटे उकळवा. कुकर थंड झाल्यावर डाग घासून काढा. कुकरचे डाग लवकर निघतील.
जळलेला कुकर साफ करण्यासाठी कुकरमध्ये पाणी भरा, त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे बेकिंग सोडा घाला आणि मंद आचेवर 10 मिनिटे उकळा. कुकर थंड झाल्यावर थोडे घासले तरी कुकर स्वच्छ निघतो.
आपल्याला जळलेला कुकर साफ करण्यासाठी सोप्या टिप्स हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.