कपड्यावर पडलेले हळदीचे डाग घालवण्यासाठी सोप्या टिप्स

लग्नकार्यात घाई गडबडीत आपल्या कपड्यांवर हळदीचे डाग पडलेले असतील तर हि माहिती आपल्यासाठीच आहे. आज आम्ही असे काही या उपायांनी कपड्यांवरील हळदीचे डाग अगदी सहज दूर होतील.

कपड्यांवरील हळदीचे डाग घालवण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापरू शकता. यासाठी एका वाटीत अर्धा चमचा डिटर्जंट पावडर आणि एक चमचा व्हिनेगर मिसळा. आता हे मिश्रण डाग झालेल्या भागावर लावा आणि चोळा. त्यानंतर पाण्याने धुवा, जर डाग एकाच वेळी निघाला नसेल तर परत एकदा असेच करा.

बेकिंग सोडा वापरून आपल्याला हळदीचे डाग काढता येऊ शकतात. बेकिंग सोड्याचा वापर केल्याने कपड्यांना कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाही. कपड्यांवरील हळदीचे डाग घालवण्यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिसळा. नंतर डाग असलेल्या भागावर लावा. काही वेळ असेच राहू द्या आणि नंतर मऊ ब्रशच्या मदतीने घासून घ्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

हळदीचे डाग जाण्यासाठी आपण जास्त प्रमाणात डिटर्जंट पावडर वापरत असाल तर तसे करू नका. जास्त प्रमाणात डिटर्जंट पावडर वापरल्याने कपड्याची लवकर झीज होते.

आपल्याला कपड्यावर पडलेले हळदीचे डाग घालवण्यासाठी सोप्या टिप्स हि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर शेयर करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page