कपड्यांवर पडलेले चिखलाचे डाग काढण्यासाठी सोप्या टिप्स

पावसात भिजायला, प्रवास करायला सगळ्यांनाच आवडत मात्र या सगळ्यात अजिबात आवडत नाही ते म्हणजे कपड्यावर पडणारे चिखलांचे डाग. बऱ्याचदा कपड्यांवरील चिखलाचे डाग निघत कपडे फेकून द्यावे लागतात.

आता हळूहळू सगळीकडेच पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता लवकरच तुमच्या कपड्यांवर चिखलाचे डाग दिसायला लागतील. पण अजिबात काळजी करू नका कारण आम्ही घेऊन आलो आहोत कपड्यावरील चिखलाचे डाग काढण्यासाठी सोप्या टिप्स

लिंबू आणि मीठ यांचे मिश्रण कपड्यावरील डाग दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पावसाळ्याच्या दिवसात कपड्यांवरील चिखलाचे डाग घालवण्यासाठी १ चमचा मीठ १ चमचा लिंबाच्या रसात मिसळून ते मिश्रण डाग झालेल्या जागेवर १५ मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर कपड्याला नेहमीप्रमाणे धुवा  त्यामुळे डाग नक्कीच कमी होतात.

बेकिंग सोडामध्ये एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात. हे कोणत्याही प्रकारचे डाग काही मिनिटांत दूर करू शकते. विशेषतः चिखलाच्या डागांवर बेकिंग सोडा लावल्याने ते लगेच साफ होतात.

कपड्यांवरील चिखलाचे डाग घालवण्यासाठी बादलीत पाणी घेऊन त्यात थोडे मीठ आणि मध टाका. आता या पाण्यात डाग लागलेले कपडे भिजवा. काही वेळानंतर हलक्या हाताने ब्रशने घासा.

कपड्यांवर पडलेले चिखलाचे डाग स्वच्छ करताना चुकूनही गरम पाण्याचा वापर करू नका. कपड्यावरील चिखलाचे डाग लगेच साफ करु नका. त्या डागांना आधी सुकू दया मगच त्यावर उपाय करा.

पांढऱ्या कपड्यावर चिखलाचे डाग असतील तर त्यावर आधी डिटर्जंट पावडर टाकून हलक्या हाताने ब्रशने घासा मग काही मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर धुवा. यामुळे हलके डाग लगेच साफ होतील.

आपल्याला कपड्यांवर पडलेले चिखलाचे डाग काढण्यासाठी सोप्या टिप्स हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्याला कोणती माहिती हवी असेल तर कमेंट करून सांगा. आम्ही ती माहिती देण्याचा प्रयत्न करू.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page