वातावरणातील धूळ, प्रदूषणामुळे, तीव्र सूर्यप्रकाशामुळे आपली त्वचा काळी पडते. आपल्या चेहऱ्याची त्वचा हि नाजूक असते. बाहेर पडताना चेहरा मास्कने अथवा स्कार्फने बांधून घेतल्यास आपण आपला चेहरा उन्हामुळे होणाऱ्या टॅनिंग पासून वाचवू शकतो.
मात्र बऱ्याचदा कितीही काळजी घेतली तरी आपल्या चेहऱ्यावर विशेषता कपाळावर काळेपणा येतो. अशा वेळी आपण कोणकोणते घरगुती उपाय आपण करू शकता याचीच माहिती आज आपण घेणार आहोत.
कपाळावरील काळेपणा एका वाटीत तांदळाचे पीठ 2 चमचे घ्या त्यामध्ये अर्धा चमचा कॉफी पावडर मिसळा त्यानंतर त्यामध्ये एक चमचा दही मिसळून पेस्ट बनवा.
हि पेस्ट लावण्याआधी चेहरा पाण्याने धुऊन नंतर हि पेस्ट आपल्या हलक्या हाताने कपाळावर चोळा. 20 मिनिटे राहूद्या नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. हा उपाय 7 दिवस केल्याने आपल्या कपाळाची त्वचा उजळ दिसू लागेल. तसेच कपाळावरील सुरकुत्या देखील कमी होतील.
कपाळावरील काळेपणा घालवण्यासाठी त्यावर नारळाचे पाणी दिवसातून दोन वेळा लावा. असे केल्याने कपाळावरील काळेपणा कमी होण्यास मदत होईल.
कपाळावरील काळेपणा कमी होण्यासाठी एका वाटीत पिकलेल्या पपईचा गर घ्या त्यामध्ये चमचाभर मध मिसळून पेस्ट बनवा हि पेस्ट आपल्या कपाळावर हलक्या हाताने लावा.
30 मिनिटे राहूद्या नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. असे केल्याने आपला चेहरा आणि कपाळ उजळ दिसू लागेल. आपल्याला कपाळावरील काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.