पावसाळ्यात हि औषधी गुणधर्म असणारी भाजी खाल्याने मिळतील आश्चर्यकारक फायदे

निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारात पोषक घटक असलेल्या गोष्टी खाणे गरजेच असत. आज आपण अश्याच एका भाजीबद्दल जाणून घेणार आहोत. छायाचित्र बघून आपल्याला अंदाज आलाच असेल आपण कोणत्या भाजीबद्दल बोलतोय.

ह्या औषधी गुणधर्म असणाऱ्या भाजीचे नाव आहे करटूले जर आपल्या भागात ह्या भाजीला वेगळ्या नावाने ओळखले जात असेल तर कमेंट करून आम्हाला सांगा.

करटूले हि भाजी पावसाळा सुरु झाला कि बाजारात दिसू लागते; दिसायला जरी कारल्या सारखी असली तरी हि भाजी तितकी कडू नसते. करटूले भाजीला हिंदीमध्ये कंटोला असे म्हटले जाते. आता आपण करटूले भाजीचा आहारात समावेश केल्याने कोणकोणते फायदे मिळू शकतात हे जाणून घेऊयात.

करटूले भाजीचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. पुरुषांनी ह्या भाजीचे सेवन केल्याने त्यांच्या शारीरिक कमजोरी दूर व्हायला मदत होते. दिवसभर उत्साह टिकून राहण्यासाठी आपण करटूले भाजीचा आहारात समावेश करू शकता. करटूले भाजीचे नियमित सेवन केल्याने स्टॅमीना वाढायला मदत मिळते.

डायबेटीस हा असणाऱ्यांनी करटूले भाजीचा आहारात समावेश केल्याने रक्तामधील साखरेचे प्रमाण संतुलित व्हायला मदत होते. ज्यांना बद्दकोष्टता आजार आहे त्यांनी करटूले भाजीचा आहारात समावेश केल्याने पोट चांगल्याप्रकारे साफ व्हायला मदत मिळते. तसेच अन्न पचन क्रिया सुधारायला मदत होते. एसिडीटीचा त्रास देखील कमी होतो.

कंटोला अर्थात करटूले भाजीचा आहारात समावेश केल्याने किडनीस्टोन ह्या आजारापासून आपला बचाव होतो. करटूले भाजी सेवन केल्याने किडनी साफ व्हायला मदत मिळते. करटूले भाजीमध्ये मेमरीडायसन आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे आपला रक्तदाब संतुलित राहायला मदत होते.

करटूले भाजीचा आहारात समावेश केल्याने नजर तीक्ष्ण होते. जर आपल्याला धूसर दिसत असेल तर आपण करटूले भाजीचा आहारात समावेश केला पाहिजे. आपल्याला औषधी गुणधर्म असणारी करटूले भाजीबद्दलची हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page