कांजण्या हा संसर्गजन्य रोग आहे. हा प्रामुख्याने दहा वर्षाखालील लहान मुलांना होतो. लहान वयामध्ये कांजण्या आल्या नाही तर मोठेपणी येण्याची शक्यता असते. परंतु सहसा कांजण्या या लहान वयातच येतात. कांजण्यामध्ये त्वचेवर लाल रंगाचे खाजवणारे अन वेदनादायी पुरळ दिसायला लागतात.
हे पुरळ पाठीवर, छातीवर, पोटावर असे संपूर्ण शरीरावर यायला सुरुवात होते. कांजण्या गेल्यावर हि त्याचे डाग तसेच राहतात. चेहऱ्यावर डाग असल्यास ते दिसायला खूपच खराब वाटतात. चेहऱ्यावर असलेल्या डागांमुळे चेहऱ्याची सुंदरता बिघडते. म्हणूनच आज आपण कांजण्याचे डाग घालवण्यासाठी काही घरगुती आपण जाणून घेऊयात.
कांजण्याचे डाग घालवण्यासाठी कोरफड उपयुक्त आहे. कोरफड ही सौंदर्यवर्धक असल्याने चेहऱ्यावरील अंगावरील कांजण्याचे डाग कमी करण्यासाठी उपयोग होतो.
या साठी ताजा कोरफडीचा गर काढून तो कांजण्यांचे डाग असलेल्या ठिकाणी रात्री झोपण्याआधी लावा. सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने काही दिवसात कांजण्याचे डाग निघून जातील.
कांजण्याचे डाग घालवण्यासाठी पपईचा गर काढून तो दुधामध्ये मिसळून त्यामध्ये थोडीशी साखर घालून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट शरीरावर ज्या ठिकाणी कांजण्याचे डाग आहेत त्या ठिकाणी लावा. पंधरा मिनिटात पर्यंत ठेवा आणि काही वेळानंतर आंघोळ करा. काही दिवस हा उपाय केल्यानंतर कांजण्याचे डाग निघून जातील.
कडुलिंब हे कांजण्याचा त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवा आणि त्वचेवर लावा. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ धुवा. एक आठवड्यामध्ये कांजण्याचे डाग, खाज कमी होण्यास मदत होते.
मधामध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवर येणारी खाज आणि कांजण्याचे डाग कमी होण्यास मदत होते. नियमित मध लावून दोन ते तीन तासांनी आंघोळ केल्याने काही दिवसातच हे डाग निघून जातील.
कांजण्याचे डाग घालवण्यासाठी चंदनाची पावडर गुलाब पाण्यात मिसळून ज्या ठिकाणी डाग आहेत त्या ठिकाणी लावा. अर्धा तास राहू द्या त्या नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. चंदनामध्ये डाग कमी करण्याचे गुण असतात. चंदन गुलाबपाण्यात मिक्स करून लावल्याने फायदा होतो.
कांजण्याचा त्रास कमी करण्यासाठी नारळाचे तेल उपयुक्त आहे. नारळाच्या तेलाने मालिश केल्याने हे डाग निघून जातात. तुम्ही नियमित कांजण्याच्या डागावर नारळाचे तेल लावले तर हे डाग कमी होतील.
आपल्याला शरीरावरील कांजण्याचे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.