कान ही फार नाजूक गोष्ट आहे. आंघोळ करताना म्हणावे तितका कान स्वच्छ होऊ शकत नाही. आणि त्यामुळे कानामध्ये मळ साचतो. यामुळे कान दुखणे, जळजळ होणे, खाज येणे असे त्रास जाणवू लागतात. आठवड्यातून दोन वेळा कानातील साचलेला मळ काढणे गरजेचे असते.
कान ही फार नाजूक गोष्ट आहे. त्यामुळे कान साफ करताना विशेष काळजी घ्या. कान साफ करण्यासाठी कानात सेफ्टीपीन, हेअरपीन किंवा मिळेल ते अणुकुचीदार वस्तू वापरून कानातील मळ काढू नका. त्यामुळे तुमच्या कानाच्या नाजूक भागास इजा होऊ शकते. आज जाणून घेऊयात कानातील मळ काढण्यासाठी घरगुती उपाय.
कानातील मळ सहजपणे निघण्यासाठी आंघोळ करताना कोमट पाण्याचे काही थेंब कानामध्ये घाला. काही वेळाने कान एका बाजूला करून कानातील पाणी बाहेर काढा. त्यामुळे कानात साचलेला मळ निघून जाईल आणि कान स्वच्छ राहील.
कानातील मळ काढण्यासाठी कापसाच्या मदतीने बदामाचे तेल थोडेसे नकळत कोमट करून ते कानात टाका आणि कापसाच्या मदतीने अथवा कापडाच्या द्वारे तुम्ही कानातील मळ सहजपणे बाहेर काढू शकता.
कानातील मळ काढण्यासाठी कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून त्याचे थेंब कापसाच्या मदतीने कानामध्ये टाका. काही वेळाने हे पाणी बाहेर काढा. याने मळ पातळ होऊन तुमचे कान स्वच्छ होतील.
कानातील मळ काढण्यासाठी ऑलिव्ह ऑईलमध्ये लसणाची एक पाकळी टाकून गरम करा. हे तेल थंड झाल्यानंतर ड्रॉप किंवा कापसाच्या सहाय्याने एक दोन थेंब कानात टाका. याने कानातील मळ सहज निघण्यास मदत मिळेल.
कानातील मळ काढण्यासाठीचे हे उपाय प्रौढ व्यक्तींनीच अमलात आणावे. लहान मुलं, वृद्ध किंवा कानाचे गंभीर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रत्येकाच्या कानात मळ होतोच.
बराच काळ कान स्वच्छ केला नसेल तर कानात घुर घुर असा आवाज येणे, ऐकायला कमी होणे अथवा कानात तीव्र वेदना होणे अशी लक्षणे दिसू लागतात. अशी लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांकडे जाऊन कान स्वच्छ करून घ्या.
आपल्याला 1 ग्लास ताक प्यायल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.