कंबरेवर असणारी चरबी कमी करण्यासाठी 9 टिप्स

आपल्या आहारात तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात असल्यास, आपल्याला अति गोड खायची सवय असल्यास, मैद्यापासून बनवेले पदार्थ आपल्या रोजच्या खाण्यात असल्यास, सतत मांसाहार केल्याने, शारीरिक व्यायाम करायची सवय नसल्यास, था’यरॉईड विकारामुळे शरीरात होणाऱ्या हार्मोन बदलांमुळे..

शरीरात झालेल्या हार्मोनल असंतुलनामुळे भूक वाढू शकते, चयापचय दर मंद होऊन आपल्या पोटाचा घेर वाढू शकतो. म्हणूनच आज आपण अशा काही सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे आपल्या पोटाचा घेर कमी करू शकाल.

शरीरावर जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी पहिली पायरी म्हणजे गोड खाण्यापासून स्वताला दूर ठेवणे. मिठाई, कोल्डड्रिंक्स अशा पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात साखर असते त्यामुळे आपल्या शरीरात लवकर चरबी जमा होते म्हणूनच अशा पदार्थापासून दूर राहा.

आपल्या आहारात फायबर घटक असलेल्या अन्नपदार्थांचा समावेश करा. गाजर, बीट, मुळा, रताळे, ताजी फळे, हिरवा भाजीपाला, कडधान्ये, ड्रायफ्रुट यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर घटक असतात. शरीरावर जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी तळलेल्या पदार्थांच्या ऐवजी भाजलेल्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा.

शरीरावरील चरबी कमी होण्यासाठी दररोज सकाळी अथवा संध्याकाळी 30 मिनिटे व्यायाम करायची सवय स्वताला लावा. व्यायाम करायला जमत नसल्यास 30 मिनिटे चालण्याची सवय लावा.

झोपेच्या कमतरतेमुळे, शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढते आणि वजन वाढण्याचे एक कारण म्हणजे शरीरात कोर्टिसोलची पातळी वाढणे. म्हणूनच पुरेशी झोप घ्या.

चरबी कमी होण्यासाठी तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तणावामुळे शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढते, ज्याला स्ट्रेस हा’र्मोन असेही म्हणतात. तणाव संप्रेरक पातळी वाढल्याने पोटावरील चरबी वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शक्य तितके तणावापासून दूर राहा.

चरबी कमी होण्यासाठी दिवसभरात पुरेशे पाणी प्या. पाणी प्यायल्याने खालेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होऊन चरबी वाढण्यावर नियंत्रण येते. आपल्याला कंबरेवर असणारी चरबी कमी करण्यासाठी 9 टिप्स हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा;  अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page