कंबरदुखी पासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय

काही वर्षांपूर्वी कंबरदुखीचा त्रास हा वयोवृद्ध झालेल्यांनाच व्हायचा मात्र आता वयाची तिशी पार केलेल्यांना देखील कंबरदुखीच्या समस्येला सामोर जाव लागत आहे. म्हणूनच आज आपण कंबरदुखी पासून आराम मिळण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. सर्वात आधी आपण कंबरदुखीची कारणे समजून घेऊयात.

एकाच जागी खूप वेळ बसून काम केल्याने, मऊ गादीवर झोपल्याने, शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास, जास्तवेळ उंच टाचा असलेल्या चपला घातल्याने, प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढल्याने कंबरदुखीची समस्या होऊ शकते. आता आपण कंबरदुखीच्या वेदनेपासून आराम देणारे घरगुती उपाय जाणून घेऊयात.

कंबरदुखीच्या वेदनेपासून आराम मिळण्यासाठी आपण मोहरीच्या तेलाने मालिश करू शकता यासाठी एक पळीभर मोहरीचे तेल गरम करायला ठेवा त्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या थोड्याश्या ठेचून टाका.

तेलाला उकळी आल्यानंतर भांडे खाली उतरवा आणि तेल गाळून घ्या. तेल जरा कोमट असतानाच हातावर घेऊन आपल्या कंबरेवर लावा आणि हलक्या हाताने मालिश करा. मालिश केल्याने वेदना कमी होऊन आराम मिळेल.

कंबर दुःखीची समस्या असल्यास भुजंगासन हे नियमित करावे हे आसन केल्याने कंबरदुखीचा त्रास कमी होतो. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम योगा करण्याच्या चटई अंथरून पोटावर झोपा त्यानंतर आपल्या दोन्ही हाताचे पंजे छाती जवळ ठेवा; आणि श्वास आत घेत कंबर पासूनचे शरीर वर उचला.

काही वेळ या स्थितीत थांबून पुन्हा खाली या. हे आसन केल्याने कंबरदुखीचा त्रास कमी होतो. कंबरदुखीचा त्रास कमी होण्यासाठी आपण धनुरासन हि करू शकता.

हे आसन करण्यासाठी पोटावर झोपा. त्यानंतर आपल्या दोन्ही पायांना गुडघ्यातून वाकवून वर उचला आणि हातांनी पायांच्या पंज्यांना पकडा. या स्थितीत काही वेळ राहिल्यानंतर परत पूर्व स्थितीत या. हे आसन केल्याने कंबरदुखीचा त्रास कमी होतो.

आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास त्यावरील उपाय जाणून घ्यायचे असल्यास कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आपल्याला कंबरदुखी पासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page