आपल्या शरीरासाठी कॅल्शियम खूप महत्वाचा घटक असतो आहे. शरीरातील हाडांच्या मजबुतीसाठी, नसा, स्नायूंच्या मजबुतीसाठी आपल्या शरीरात पुरेशे कॅल्शियम असणे गरजेच असते.
स्त्रियांना एका दिवसाला 1,000 मिलिग्राम आणि 50 पेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना एका दिवसाला 1200 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. मासिक पाळी, गर्भधारणा, स्तनपान यामुळे त्यांच्या शरीरातील कॅल्शियमचा वापर अधिक प्रमाणात होत असतो, म्हणून स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत अधिक कॅल्शियमची आवश्यकता असते.
म्हणूनच आज आपण स्त्रियांमध्ये होणाऱ्या कॅल्शियम कमतरतेवरील उपाय जाणून घेणार आहोत. हि माहिती महत्वपूर्ण असल्याने आपल्या ओळखीच्या स्त्रियांना कमेंटमध्ये टॅग करून त्यांच्यापर्यंत हि माहिती पोहचवायला विसरू नका.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात, हात पायांना मुंग्या येतात, दात कमकुवत होतात, सांधे दुखतात, थोड काम केल तरी थकवा येतो, निरुत्साहपणा वाढतो, चिडचिडेपणा वाढतो.
आपण आपल्या आहारात आणि जीवनशैलीमध्ये थोडा बदल केला तर आपण शरीरातील कॅल्शियम कमतरता दूर करू शकाल. कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, आपल्या रोजच्या आहारात दुध, दही, पनीर अशा दुग्धयुक्त पदार्थांचा समावेश करा.
हाडे मजबूत करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण आहारात सोयाबीनचा देखील समावेश करू शकतो. दररोज भिजवलेले बदाम खाल्ल्याने आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होईल.
आवळ्यामध्ये भरपूर एंटीऑक्सिडंट घटक असतात. कॅल्शियमची कमतरता दूर होण्यासाठी आपण आवळा खाऊ शकता. कॅल्शियमची कमतरता दूर होण्यासाठी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या खाऊ शकता.
कॅल्शियमची कमतरता दूर होण्यासाठी आपण सीफूड देखील खाऊ शकता. सीफूडमध्ये देखील कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. दररोज साधारण 30 मिनिटे कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये थांबा. जेणेकरून आपले शरीर कॅल्शियम शोषून घेईल.
संतुलित आहार आणि दैनंदिन थोडसा व्यायाम करायची सवय आपण स्वताला लावली तर आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होईल. आपल्याला महिलांच्या शरीरातील कॅल्शियम कमतरतेवर उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.