मनुके सेवन करण्याचे बरेच फायदे आहेत. काळ्या मनुक्यामध्ये प्रथिने, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे अनेक प्रकारचे पौष्टिक घटक त्यांच्यामध्ये आढळतात. चला तर मग काळ्या मनुकापासून आरोग्यास मिळणार्याआ काही जबरदस्त फायद्यांविषयी जाणून घेऊयात.
काळ्या मनुक्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तासंदर्भातील आजारांवर काळे मनुके गुणकारी असतात. काळे मनुके खाल्ल्याने दातासंबंधीच्या समस्या दूर राहतात. दाताना कीड लागणे, दात तुटल्यावर मनुक्यांचे सेवन करा. मनुक्यामध्ये असलेल्या ओलियानोलिक ऍसिडमुळे दातासंबंधीच्या तक्रारीवर मात मिळवता येते.
नियमित मनुके खाल्ल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते. मनुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. मनुके खाल्याने पोट साफ होण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होईल. मनुकांच्या सेवनाने हृदयाचे आरोग्यही राखले जाते.
जर आपल्या शरीरात हिमग्लोबीन कमी असेल तर रात्री 10 ते 12 काळे मनुके ग्लासभर दुधात भिजवून काही दिवस प्या आणि मनुके खा. आपल्याला अगदी कमी कालावधीत फरक जाणवेल.
नियमित काळ्या मनुक्याचे सेवन केल्याने आपली दृष्टी सुधारण्यास मदत मिळेल. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाण्यात भिजवलेले मनुके खा आणि पाणी पिऊन टाका. असे केल्याने आपले पोट सकाळी व्यवस्थित साफ होईल.
काळ्या मनुक्यामध्ये पित्तशामक गुणधर्म असतात. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी पाण्यात भिजवलेले मनुके खा असे केल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत मिळेल. नियमित काळ्या मनुक्याचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढते.
आपल्याला काळे मनुके खाण्याचे आरोग्यदायी फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. आमचे फेसबुक पेज लाइक करा.