kailas parvat

एव्हरेस्ट पेक्षा कमी उंचीचा पर्वत असूनही इथे कोणीही गेलं नाही

Mahtvache

आज पर्यंत आपण बघितलं असेल की अमुक अमुक पर्वत गिर्यारोहकांनी सर केला वैगेरे वैगरे पण आपल्या पैकी किती लोकांनी ऐकलंय की एखाद्या गिर्यारोहकाने कैलास पर्वत सर केला? ऐकलंय का? गूगल वर सर्च केलं तरी काही माहिती मिळणार नाही. तसं बघितलं तर कैलास पर्वत हा माउंट एव्हरेस्ट पेक्षा कमी उंचीचा पर्वत आहे.

पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या पर्वताच्या माथ्यावर आजवर एकही व्यक्ती पोहचू शकलेला नाही. म्हणजे एकीकडे जगातील सर्वोच्च शिखरावर तुम्ही जाऊ शकता. पण त्यापेक्षा तब्बल २००० मी. कमी उंचीच्या कैलास पर्वतावर पोहचू शकत नाही म्हणजे अद्याप तरी कोणी तिथपर्यंत पोहोचलेलं नाही.

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पोहचणे अशक्य आहे. त्याचे कारण म्हणजे जो कोणी या पर्वतावर जातो तो आपला रस्ता चुकतो. आपल्याला माथा तर दिसत असतो परंतु तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडत नाही. अनेक गिर्यारोहकांनी आपला अनुभव सांगितला आहे की माथ्याच्या जवळपास पोहचताच जोरजोरात हिमवादळे सुरु होतात आणि या भयानक परिस्थितीमध्ये मनुष्य प्राणी इंच देखील हलू शकत नाही अथवा पुढे जाऊ शकत नाही.

कैलास पर्वतावर जर पारंपरिक साधनांनी जाऊ शकत नाही तर मग हॅलिकॉप्टरचा वापर का करत नाही? हेलिकॉप्टर ने कैलास पर्वताच्या मार्गात असणाऱ्या मानसरोवर पर्यंत जाता येतं पण अद्भुत आणि गूढ अशा कैलास पर्वताच्या शिखरापर्यंत जाता येत नाही. तसे अनेकदा प्रयत्न करून झाले परंतु प्रत्येकवेळी ते प्रयत्न असफल झाले.

आकाश आणि पृथ्वी ला जोडणारा तसेच दहा दिशा एकत्र येणारे ठिकाण म्हणून कैलास पर्वत ओळखला जातो. तसेच आणखी एक कारण म्हणजे जगातील सर्वाधिक शुद्ध तलाव असणाऱ्या मानसरोवर ची यात्रा. हिंदू धर्मात या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्व आहे. शीख धर्माचे गुरू गुरुनानक यांनीही याच ठिकाणी ध्यानसाधना केली होती असे म्हटले जाते.

काश्मीर पासून ते भूतान पर्यंत कैलास पर्वत पसरलेला आहे. हवाई मार्गाचा वापर केला तर काठमांडू पर्यंत विमानाने जाऊन त्यापुढे रस्तामार्गे जाता येते. कैलास यात्रेसाठी हेलिकॉप्टर चा वापर करता येतो त्यासाठी काठमांडू – नेपालगंज – सिमीकोट असा प्रवास करावा लागतो. पण हा प्रवास मानसरोवरपर्यंतच करता येतो. मानसरोवरपर्यंत रस्तामार्गे जाण्यासाठी दणकट वाहने असावी लागतात.

दक्षिण आणि उत्तर ध्रुवाचे केंद्र असल्याने अनेक शास्त्रज्ञ असे दावा करतात की हे पृथ्वीचे केंद्र आहे. त्यामुळे कदाचित येथील वातावरणात वारंवार बदल होत असावेत. तसेच रशियामध्ये झालेल्या संशोधनानुसार या जागेला Axis Mundi म्हणतात म्हणजे जिथे दहा दिशा एकत्र येतात. त्यामुळे याठिकाणी वेगवेगळ्या लहरींचा मुक्त संचार आहे. यासोबत ही भूमी हिंदू, शीख, बौद्ध तसेच जैन धर्माचे महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. 

या ठिकाणच्या मानस सरोवर येथील यात्रेबद्धल अनेक जणांना महितीपण असेल. हे साक्षात भगवान शंकराचे निवास स्थान होय. कैलास पर्वतावर अद्भुत शक्तींचा वास असल्याचे मानले जाते. या पर्वताच्या भोवती राहणाऱ्या भिक्षुंनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला असून येथे राहण्याने जीवनमानात वेगळा फरक झाल्याचा अनुभव त्यांना आला आहे.

जगातील सर्वाधिक शुद्ध पाण्याचं सरोवर आहे अगदी तसेच इथे मोठे खाऱ्या पाण्याचे देखील सरोवर आहे. आणि त्याही पेक्षा विशेष बाब अशी की या पर्वताचा आकार पिरॅमिड स्वरूपात असल्याने याच्या चारही बाजुंनी चार मोठ्या नद्या उगम पावतात त्या नद्या म्हणजे ब्रम्हपुत्रा, सतलज, करणाली आणि सिंधू. याशिवाय या पर्वतावर यति म्हणजेच हिम मानव असल्याचं जगभरातील तीस पेक्षा जास्त शास्त्रज्ञानी दावा केला आहे.

जगातील सर्वात महाग असलेला कस्तुरी मृग देखील या भागांत आढळतो. हरणासारखा दिसणाऱ्या या प्राण्यांच्या नाभी मध्ये एक अत्यंत मंद पण मोहून टाकणारा सुगंधी खडा सदृश्य भाग असतो ज्याचा औषधांमध्ये वापर केला जातो. जगातील अत्यंत दुर्मिळ प्राणी या ठिकाणी आढळतो.

मानस सरोवर पासून पर्वताच्या दिशेने गेलं की सतत कसला तरी आवाज येत राहतो. जो यात्रेकरूंना डमरू अथवा ओम गुंजनाचा भासतो. तर शास्त्रीय पद्धतीने सांगायचं झालं तर बर्फ प्रकाशाच्या लहरी, वाऱ्याचे झोत आणि त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थिती नुसार घर्षणाने जो ध्वनी घुमला जातो त्यामुळे त्या ठिकाणी ओम असा गुंजन केल्या प्रमाणे भासतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *