2-3 कडुलिंबाच्या पानांचे सेवन दररोज केल्यासकोणकोणते फायदे मिळतात?

आपण निरोगी आणि स्वस्थ राहाव अस आम्हाला वाटत म्हणूनच आम्ही आपल्यासाठी वेगवेगळ्या औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पतींची माहिती घेऊन येत असतो. आज आपण कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने मिळणारे फायदे समजून घेणार आहोत.

कडुलिंब हि अशी औषधी वनस्पती आहे जिचे पान, फुल, फळ, साल असा प्रत्येक भाग कोणत्या न कोणत्यातरी आजारावर गुणकारी असतो. आपण जर नियमितपणे 2-3 कडुलिंबाच्या पानांचे सेवन केले तर मधुमेह आजार नियंत्रित व्हायला मदत मिळते.

कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने कफ, खोकला असे आजार बरे व्ह्ययला मदत मिळते. तसेच या आजारांविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असणारी रोगप्रतिकार शक्ती आपल्या शरीरात तयार होते.

नियमितपणे 2-3 कडुलिंबाच्या पानांचे सेवन केले तर आपली पचनशक्ती चांगली होते, बद्धकोष्ठता आजारापासून आराम मिळू शकतो. अंगाला खाज येत असेल तर त्यावर कडुलिंबाच्या पानांची पेस्ट करून लावली तर खाज येणे थांबते तसेच वेदना देखील कमी होतात.

कोणतीही जखम झाली असेल तर त्यावर कडुलिंबाच्या पानांची बारीक केलेली पेस्ट लावली तर जखम लवकर बरी होते. जखम मोठी असेल तर आपण त्यावर कडुलिंबाच्या सालीपासून बनवलेली पावडर देखील लावू शकता.

कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात. नियमित कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील पुरळ कमी व्हायला मदत मिळते.

कांजण्या आल्या असल्यास आंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाच्या पाने चुरगळून टाका. नियमित अशा पाण्याने अंघोळ केली तर आपल्याला कोणताही त्वचारोग होत नाही तसेच कांजण्यामुळे झालेल्या जखमांवर आपण कडुलिंबाच्या पानांची पेस्ट लावू शकता. आपल्याला कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने मिळणारे फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page