कढीपत्त्याचे आरोग्यदायी फायदे

कढीपत्ता स्वयंपाक घरातील महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक घरात फोडणी देण्यासाठी कढीपत्ता वापरला जातो. कढीपत्ता हा सहज आणि स्वस्त आहे. बऱ्याच जणांना कडीपत्ता खाणे आवडत नाही. त्यामुळे ते कडीपत्ता सेवन करीत नाहीत.

परंतु कडीपत्त्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊया कढीपत्ता खाण्याचे फायदे कोणते आहेत. कढीपत्ता हा केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

ज्यांना केस गळतीची समस्या आहे त्यांनी कडीपत्ता आवर्जून खावे. कढीपत्ता खोबरेल तेलात उकळून त्याचे तयार झालेले तेल थंड करून लावल्यास केसांची चांगली वाढ होते.

पचनशक्ती वाढवण्यासाठी कढीपत्ता खाणे फायद्याचे आहे. ज्यांना वारंवार अजीर्णाचा त्रास होतो त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय आहे. कढीपत्ता खाल्ल्याने पचन शक्तीचा त्रास नाहीसा होईल आणि तुमचे पोट नेहमी साफ राहील. कढीपत्याचे सेवन केल्याने शरीरातील रक्तशुद्धीकरण क्रिया चांगल्याप्रकारे होते.  

अकाली केस पांढरे होण्याचा त्रास  बऱ्याच व्यक्तींना होताना दिसून येत आहे. अगदी 10 ते 15 या वयोगटातील मुलांचे केसही आजकाल लवकर पांढरे होतात. कढीपत्यामधील व्हिटॅमिन E तुमच्या केसांचा काळा रंग टिकून राहतो. केस पांढरे होण्यापासून कढीपत्ता परावृत्त करते म्हणून आहारात कढीपत्ता असायला हवा.

ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी कढीपत्ता खाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा रुग्णांनी कडीपत्त्याची दहा ते बारा पाने दिवसातून तीन वेळा चघळल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते आणि मधुमेहावर नियंत्रण होऊन हा त्रास हळूहळू नाहीसा होईल.

वारंवार सर्दी, खोकल्याची समस्या उद्भवत असेल तर सकाळी अनुशापोटी कढीपत्त्याची 10 ते 15 पाने चावून खाल्ल्यास सर्दी खोकल्याचा त्रास नाहीसा होईल. सर्दी खोकला कमी करण्यासाठी कडीपत्त्याचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर आहे.

आपल्या आरोग्यासाठी कढीपत्त्याचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे फोडणीत असलेला कडीपत्ता बाजूला काढून न टाकता त्याचे सेवन करा. तुम्हाला तुमचे आरोग्य सुधारण्यास कडीपत्ता फार मदत करेल.

आपल्याला कडीपत्त्याचे आरोग्यदायी फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा.

Leave a Comment

You cannot copy content of this page