ज्वारीची भाकरी खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे

आपण निरोगी आणि स्वस्थ राहावे अस आम्हाला वाटत म्हणूनच आम्ही नियमित आरोग्यासाठी महत्वपूर्ण असणारी माहिती घेऊन येत असतो आज आपण आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश केला तर आपल्याला कोणकोणते फायदे मिळतात हे जाणून घेणार आहोत.

शरीराचे पोषण योग्यप्रकारे होण्यासाठी सकस आणि पोषणयुक्त गोष्टींचा आपल्या आहारात समावेश असणे गरजेच असत. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांपेक्षा शहरात राहणाऱ्यांना आरोग्या विषयक समस्या जास्त प्रमाणात असतात. ग्रामीण भागात आजही मुख्य अन्न म्हणून ज्वारीला प्राधान्य दिले जात.

ज्वारीमध्ये प्रोटीन, फायबर, आयरन, कॉपर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशिअम असे पोषक घटक असतात. मजबूत हाडांसाठी कॅल्शियम खूप महत्वाचे असते. ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्याने आपली स्नायू आणि हाडे मजबूत व्हायला मदत मिळते.

ज्वारी मध्ये फायबर घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे मुळव्याध हा आजार असल्यास ज्वारीच्या भाकरीचा आपण आहारात समावेश करू शकता. ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्याने कोलेस्ट्रोलचे प्रमाण नियंत्रणात राहायला मदत मिळते.

सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर आपण आपल्या आहारात ज्वारीचा समावेश करू शकता. ज्वारीमध्ये असणाऱ्या फायबर घटकांमुळे पचन चांगल्याप्रकारे व्हायला मदत मिळते आणि पोट हि व्यवस्थित साफ होत.

ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्याने शरीरातील इन्सुलीनची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. म्हणूनच मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी आपण ज्वारीचा आहारात समावेश करू शकता.

ज्वारीमध्ये असणाऱ्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्स घटकांमुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहायला मदत मिळते. ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्याने दृष्टी दीर्घकाळ चांगली राहते.

चेहऱ्यावर मुरूम आले असल्यास ज्वारीचे पीठ पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावले तर मुरूम कमी व्हायला मदत मिळू शकते. आपल्याला ज्वारीची भाकरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page