उदरी संस्कार घडले म्हणुनी स्वराज्य स्थापिले शिवबाने..

माता जिजाऊंना डोहाळे लागले. स्वराज्याचा शिवसूर्य जन्मास येण्याची चाहून माता जिजाऊंना लागली. पण ही चालू भली अजबच होती. हे डोहाळे इतर स्त्रियांपेक्षा अधिकच वेगळे होते. हातात तलवार घेणे, दानपट्टा चालवणे, अश्वारोहन हे डोहाळे जिजाऊंना लागले होते.

असे म्हणतात ना बाळ पोटात असते तेव्हा चांगले संस्कार करावे, चांगले वागावे. असे केल्यास जन्माला येणाऱ्या मुलावर चांगले संस्कार होतात. हो हे खरं आहे. याचे सर्वात उत्तम आणि सर्व स्त्रियांनी आदर्श घ्यावा असे उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ. शिवबा पोटात वाढत असताना आई जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज्यांवर संस्कार केले.

छत्रपती शिवाजी महाराज्यांचा जन्म झाला आणि स्वराज्याने एका नवीन युगामध्ये प्रवेश केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 14 व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि हा संकल्प पूर्ण केला. यामागे सर्वात मोठी प्रेरणा होती माता जिजाउंची.

शिवबा लहान असतानाच माता जिजाऊ त्यांना रामायण, महाभारत यातील कथा सांगत असत. इतक्या लहान वयातच महाराज्यांना कृष्णनिती समजली होती. म्हणून पुढे गनिमीकावा घडला.

प्रत्येक स्त्रीमध्ये माता, बहीण पहावी. परस्त्री पापाय समान। हे संस्कार शिवबांवर होते. त्याकाळी स्त्रियांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणाची नव्हती. आईची अज्ञा प्रमाण मानून शिवबा कार्य करत. म्हणून आज राजेंची कीर्ती तिन्ही लोकी आहे.

राजमाता जिजाऊ अत्यंत हुशार, कर्तबगार आणि धैर्यशील होत्या. म्ह्णूनच छत्रपती शिवाजी महाराज घडले. अन्यथा स्वराज्याचा इतका मोठा डोलारा सर्वसामान्य माणसाला सांभाळणे फारच कठीण.

आज प्रत्येक मातेने जिजाऊंचा हा आदर्श नक्की उरी बाळगला पाहिजे. आज स्त्रियांवर होणारे अत्याचार बंद होण्यासाठी प्रत्येक स्त्रीने ‘जिजा’ बनले पाहिजे. तरच शिवबा जन्माला येतील. कोवळ्या वयात जर चांगल्या संस्काराची खाण मुलांच्या उदरी निर्माण केली तरच राष्ट्र उन्नती होऊ शकेल.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा. पेज लाईक करा धन्यवाद.

Leave a Comment

You cannot copy content of this page