जीभ आणि तोंडाला येणाऱ्या फोडांवर घरगुती उपाय

आपल्या ओठांना, जीभेला, टाळूला लहान लहान फोड आल्यास आपण त्याला तोंड येणे असे म्हणतो. तोंड आल्यावर जीभ आणि संपूर्ण तोंड आतल्या बाजूने  घशापर्यंत लाल होते. तोंड आल्यावर आपल्याला काही खाता येतं नाही.

अति गोड पदार्थ खायची सवय असल्यास, मसालेदार पदार्थ खायची सवय असल्यास, पोट व्यवस्थित साफ होत नसल्यास, शरीरात विटामिन बी12 ची कमतरता असल्यास, पुरेशी झोप घेत नसल्यास तोंड येण्याची समस्या होत असते. आज आपण  जीभ आणि तोंडाला येणाऱ्या फोडांवर घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

तोंड आल्यावर आपल्या घरात जेष्ट मध असल्यास आपण काही वेळ जेष्ठ मधाची कांडी चघळा असे केल्याने आपल्याला लवकर आराम मिळू शकतो. तोंडाला आतल्या बाजूला फोड आले असल्यास दिवसातून 3 वेळा कपभर ताक प्या, ताक प्यायल्याने वेदना कमी होतील. आणि आपल्याला बरे वाटेल.

तोंड आल्यावर आपण जाईची पाने चघळू शकता. यासाठी जाईची ५ – ६ पाने स्वच्छ धुवून चघळावीत. जाईची पाने चघळताना पानांचा रस जीभ व गालाच्या अंतर्भागाशी चांगला लागेल अश्या प्रकारे चघळा. जाईच्या पानाचा रस गिळण्याने काहीही अपाय होत नाही. हा उपाय दिवसातून ३ – ४ वेळा, या प्रमाणे 1-2  दिवस केल्यास आपल्याला आराम वाटेल.

तोंड आल्यावर एक केळी गाईच्या दुधाबरोबर खा; असे केल्याने तोंडाला आतून आलेले फोड बरे होण्यास मदत होईल. तोंड आल्यावर नारळाचे पाणी प्या. तसेच नारळाचे कच्चे  खोबरे चावून चावून खा असे केल्याने आपल्याला आराम मिळेल.

तोंड आल्यावर तोंडली ची भाजी किंवा कच्चे तोंडली खाल्याने देखील आराम मिळतो. शक्यतो ताजी तोंडली खाण्याचा प्रयत्न करा. कारण ताज्या तोंडल्याच्या रसाने आपल्याला आराम मिळतो.

तोंड आल्यावर रात्री पुरेशी झोप घेतल्याने देखील आराम वाटतो. तोंड आल्यावर तुरटीच्या पाण्याने पाण्याने चूळ भरल्याने वेदना काही काळ कमी होतात.

विटामिन बी12 च्या कमतरतेमुळे तोंड येत असल्यास दुध आणि दुग्धजन्य पदार्थ खा. सारखे सारखे तोंड येत असल्यास आपल्या आहारात पुरेश्या पालेभाज्या असू द्या.

आपल्याला जीभ आणि तोंडाला येणाऱ्या फोडांवर घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये नक्की सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक केले पाहिजे.

या माहितीत काही बदल सुचवायचे असल्यास आपण आम्हाला मेसेजमध्ये सांगू शकता. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page