झुरळ घालवण्यासाठी घरगुती उपाय

पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता असते. झुरळांच्या वाढीसाठी हा सर्वात अनुकूल काळ असतो. म्हणूनच किचन, स्टोअररूम, पुस्तके ठेवण्याच्या जागेवर, फ्रीजच्या कोपऱ्यांमध्ये कपड्यांच्या कपाटात झुरळ दिसायला लागतात.

झुरळांना मारण्यासाठी  बाजारात बरेच केमिकल स्प्रे मिळतात मात्र किचनमध्ये असे केमिकलयुक्त स्प्रे वापरता येत नाही. म्हणूनच आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यांच्या मदतीने आपण घरातील झुरळांचा वावर थांबवू शकता.

स्वयंपाकघरातील झुरळांचा वावर थांबवण्यासाठी काही तमालपत्राची पाने कुटून त्याचा चुरा बनवा आणि हा चुरा आपल्या स्वयंपाकघर आणि घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये टाका. तमालपत्राच्या सुगंधामुळे घराच्या काना कोपऱ्यांमध्ये लपलेली झुरळ देखील निघून जातात.

स्वयंपाकघरात ज्या ठिकाणी झुरळांचा वावर आहे त्याठिकाणी कडूलिंबाचे तेल शिंपडा असे केल्याने त्याठिकाणी झुरळ येणार नाही. अथवा कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून झुरळ असलेल्या जागेवर शिंपडा. झुरळ असलेल्या ठिकाणी बेकिंग सोडा पाण्यात मिसळून टाका. बेकिंग सोड्यामुळे घरातील झुरळांचा वावर कमी होतो.

झुरळांना लवंगेचा वास सहन होत नाही. आपण स्वयंपाकघरात ज्या ठिकाणी झुरळांचा वावर आहे त्याठिकाणी 2-3 लवंग ठेवू शकता. ज्या ठिकाणी खाण्यापिण्याच्या गोष्टी ठेवत नाहीत त्याठिकाणी रॉकेल फवारल्याने झुरळ पळून जातात.

आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या सिंक, टेबल, फर्निचरला भेगा पडल्या असतील तर त्या पांढऱ्या सिमेंट अथवा एमसीएलच्या साहाय्याने ताबडतोब भरून टाका. या जागांवर झुरळे लपून अंडी घालत असतात.

स्वयंपाकघरात झुरळ होऊ नये यासाठी फळे आणि भाज्यांची सालं जास्त वेळ घरात राहू देऊ नका. घरात संपूर्ण स्वच्छता ठेवा. घराच्या कानाकोपऱ्यात घाण राहू देऊ नका.

आपल्याला झुरळ घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला सांगा. माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट करा. अजून काही सुचवायचे असल्यास ते देखील कमेंट करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page