जेवण केल्यानंतर थोडसा गुळ खाल्याने होणारे आरोग्यदायी फायदे

आपल्या आजी-आजोबांच्या काळात जेवल्यानंतर गुळ खाण्याची जुनी परंपरा होती. हि परंपरा आज ही गावागावात आणि शहरांमध्ये काही ठिकाणी पहायला मिळते. गुळात अनेक औषधी गुणधर्म असतात. यामुळेच जुन्या काळी लोक किरकोळ आजारांपासून मुक्त राहत असत.

गुळात खुप गुण असतात. यातील लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक इत्यादी महत्त्वाची खनिजे आपल्या शरीराला पौष्टिक फायदे देतात आणि जीवनसत्त्वे आणि इतर औषधी गुणधर्म आपली प्रतिकारशक्ती वाढवतात. चला आज जाणून घेऊया गुळामुळे आपले शरीर सर्व आजारांपासून कसे सुरक्षित राहते.

गूळ आपल्या शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकून शरीर स्वच्छ करण्यात यकृताला मदत करतो. त्यामुळे यकृताचे काम हलके होते. म्हणून शरीराला प्रभावीपणे डिटॉक्स करायचे असेल, तर जेवल्यानंतर गुळाचा तुकडा जरूर खा.

अन्न खाल्ल्यानंतर गुळाचा एक छोटा तुकडा नियमितपणे खाल्ल्याने आपल्या शरीरात पाचक एन्झाइम्स आणि आतडे सक्रियपणे कार्य करतात. त्यामुळे आतड्यांमध्ये मल वगैरे जमा होत नाही, त्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

गुळाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो रक्त शुद्ध करणारा आहे. जर तुम्ही गूळाचे नियमित सेवन केले तर तुमचे रक्त नेहमी स्वच्छ राहते. आणि स्वच्छ रक्त म्हणजे निरोगी शरीर. त्यामुळे रोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गुळाचे सेवन केले पाहिजे. यामुळे लहान-मोठ्या आजारांपासून दूर राहता येते.

गुळामध्ये पाचक तत्व असण्यासोबतच ते उष्ण ही असते. त्याच्या नियमित सेवनाने खोकला, सर्दीची शक्यता कमी होते. दररोज एक ग्लास कोमट पाण्यात गूळ मिसळून प्या.

किंवा तुम्ही जो चहा रोज पितात त्यात साखरेऐवजी गूळ आणि आले टाकून प्या. त्यामुळे त्याची चवही स्वादिष्ट होईल. तसेच हिवाळ्यात  गुळाचे सेवन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात करणे चांगले मानले जाते.

गूळ हा एक नैसर्गिक घटक आहे जो शरीराला पूर्णपणे शुद्ध करतो. हे श्वसनमार्ग, फुफ्फुस, आतडे, पोट आणि अन्ननलिका कार्यक्षमतेने स्वच्छ करते.

म्हणूच बरेचशे डॉक्टर शरीरातील नको असलेले घटक काढून टाकण्यासाठी गूळ खाण्याचा सल्ला देतात. कारखाने किंवा कोळसा खाणींसारख्या प्रदूषित भागात काम करणाऱ्यांनाही दिवसातून एक किंवा दोनदा गूळ खाण्यास सांगितले जाते.

गूळ नियमितपणे खाणाऱ्यांची हाडे मजबूत होतात. कारण गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जस्त इत्यादी अनेक प्रकारची खनिजे मुबलक प्रमाणात असतात आणि हे सर्व घटक हाडे मजबूत करतात. जर तुम्हाला खूप दिवसांपासून सांधेदुखीची तक्रार असेल तर गूळ आणि आल्याचे सेवन करा त्याचा फायदा होईल.

मोबाईल, लॅपटॉपवर जास्त वेळ घालवल्याने किंवा आहारातील पोषण अनियमिततेमुळे डोळे कमजोर होऊ लागतात. गुळामध्ये डोळ्यांसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात, अशा स्थितीत गुळाचे नियमित सेवन केल्याने तुमच्या कमजोर डोळ्यांना पोषण मिळू शकते.

आपल्याला जेवण केल्यानंतर थोडसा गुळ खाल्याने होणारे आरोग्यदायी फायदे हि माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर शेयर करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page