जेवण केल्यानंतर लगेच या 6 गोष्टी केल्याने वजन वाढत, अन्न पचन व्यवस्थित होत नाही एसिडीटी होते

आपण खालेल्या अन्नपदार्थांमधील पोषक घटक जो पर्यंत शोषले जात नाहीत तो पर्यंत पोषणप्रक्रिया पूर्ण होत नाही. आपल्यापैकी बरेच जेवण केल्यानंतर काही छोट्या चुका करतात त्यामुळे त्यांचे वजन वाढत, एसिडीटी होते, पोट फुगत, गॅस होतात, छातीत जळजळ होते, पोटात जळजळ होते.

त्यामुळेच आज आपण जेवण केल्यानंतर लगेच कोणकोणत्या गोष्टी करणे टाळले पाहिजे हे जाणून घेणार आहोत. जेणेकरून आपण इथून पुढे ह्या गोष्टी करणे थांबवू शकता.

जेवण केल्यावर लगेचच चहा प्यायल्याने आपल्याला एसिडीटीचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच जेवण केल्यानंतर लगेचच चहाचे सेवन करणे आपण टाळले पाहिजे.

जेवण केल्यावर लगेच पाणी पिवू नका. आपल्या शरीरात चांगल्याप्रकारे पाचक रस निर्माण होण्यासाठी जेवण करण्याआधी एक ग्लास पाणी आपण पिऊ शकता. तसेच जेवण केल्यानंतर वीस ते पंचवीस मिनिटांनी आपण पाणी प्यायले पाहिजे.

जेवण केल्यानंतर फळांचे सेवन करणे टाळले पाहिजे. आपल्या जेवणाच्या तुलनेत फळ हि पचायला हलकी असतात. जेवणानंतर लगेच फळे खाल्ल्याने अन्नपदार्थांमधील पोषक घटक आपल्याला मिळत नाही.

जेवण केल्यानंतर लगेच झोपणे टाळले पाहिजे. जेवण केल्यानंतर लगेच झोपल्याने अन्न पचन व्हायला अधिक वेळ लागतो. खाल्यानंतर लगेच झोपल्याने आपले वजन वाढू शकते. गॅस होऊ शकतात.

आपल्याला भूक आहे त्यापेक्षा 2 घास कमी जेवण करणे आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे. भूक आहे त्यापेक्षा  जास्त अन्न खाल्याने अपचन होऊ शकते.

जेवण केल्यावर लगेच धु’म्रपान करणे टाळा. तसे केल्याने अपचन होऊन एसीडीटी होण्याचा धोका असतो. आपल्याला जेवण केल्यानंतर लगेच कोणकोणत्या गोष्टी करणे टाळले पाहिजे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page