जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी ठरू शकते घातक; होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

आपल्या देशात मीठाला ‘अन्नाचा राजा’ मानले जाते. मीठाशिवाय अन्नाला चव लागत नाही. तसेच मीठ न खाल्याने किंवा कमी खाल्ल्याने किरकोळ समस्या उद्भवू शकतात. विशेषतः यकृत, हृदय आणि थायरॉईड इत्यादींच्या सुरळीत कार्यासाठी मीठ खूप महत्वाचे आहे.

पण ‘प्रत्येक गोष्टीचा अतिरेक वाईट’ अशी एक प्रसिद्ध म्हण आहे. त्याचप्रमाणे जास्त मीठ खाल्ल्यानेही शरीराला मोठी हानी होते आणि जेवणात वरून मीठ घातल्यास ते आरोग्यासाठी आणखी घातक ठरू शकते.

जास्त मीठ खाल्ल्याने तुम्हाला किरकोळ ते धोकादायक आजार होऊ शकतात, काही वेळा हे आजार प्राणघातक ठरतात. जास्त मीठ खाल्ल्याने कोणते आजार होण्याची शक्यता असते ते आज आपण जाणून घेणार आहोत.

जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने त्वचेचे अनेक आजार होऊ शकतात. अनेकदा ज्यांना शरीरावर जास्त खाज येण्याची तक्रार असते, त्यामागील एक कारण म्हणजे जास्त मीठ खाणे. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात जळजळ, अंगदुखी, लाल पुरळ, यासारखे आजार त्रास देतात.

शरीरात जास्त प्रमाणात सोडियम म्हणजेच मीठ असल्याने केसांची मुळे कमकुवत होऊ लागतात, त्यामुळे केस झपाट्याने गळू लागतात. अशा स्थितीत मिठाचे सेवन कमी करावे. मीठामुळे केसांमध्ये कोंड्याची तक्रार ही होऊ शकते.

जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने शरीरातून लघवी आणि घामाच्या रूपात पाणी तुलनेने वेगाने बाहेर पडू लागते, अशा स्थितीत किडनीवर जास्त दाब पडतो, त्यामुळे दीर्घकाळ किडनी खराब होण्याची शक्यता असते आणि कालांतराने ते वाढू शकते.

जास्त मीठ खाल्ल्याने हाडांमधील कॅल्शियम हळूहळू कमी होऊ लागते. यामुळे हाडे कमकुवत होऊ लागतात आणि व्यक्तीला ऑस्टियोपोरोसिस सारख्या गंभीर आजारांचा त्रास होऊ लागतो.

एका संशोधनानुसार, सुमारे साडेतीन लाख लोकांच्या तपासणीत असे आढळून आले की, जे लोक दररोज 3 ग्रॅम मीठ खातात त्यांना 1 ग्रॅम मीठ खाणाऱ्यांपेक्षा कोलन कॅ’न्सरचा धोका जास्त असतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जास्त प्रमाणात मीठयुक्त आहार घेतल्यास पोटात अल्सर किंवा जळजळ होते, ज्यामुळे व्यक्तीला पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.

काही संशोधन अहवाल सुचवतात की, जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो आणि रक्तवाहिन्या आणि धमन्या कडक होतात. त्यामुळे हृदयविकार आणि अकाली मृत्यूचा धोका असू शकतो.

एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक दररोज 5.8 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खातात त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होते, तर जे लोक दररोज 15 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खातात त्यांचा मृत्यू दर जास्त होता.

जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची शक्यता वाढते. जर तुम्ही आधीच याचे रुग्ण असाल तर जेवणात मीठ कमीत कमी प्रमाणात घेणे सुरू करा. असे केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. लक्षात ठेवा की अनियंत्रित रक्तदाब सर्व प्रकारच्या आजारांना आमंत्रण देतो.

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page