त्वचा विकार, मुतखडा, मधुमेह अशा आजारांवर रामबाण इलाज; विलायती चिंच खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

आपण ग्रामीण भागात राहत असाल तर विलायती चिंच हे नाव नक्कीच ऐकले असेल. विलायती चिंच चवीला चांगली असते तितकेच तिचे आरोग्यासाठी फायदे आहेत.

विलायती चिंचेमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, लोह, कार्बोहायड्रेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, प्रथिने, व्हिटॅमिन सी आणि थायामिन सारखे पोषक घटक असतात.

विलायती चिंचेत एंटीऑक्सीडेंट, एंटी-इंफ्लेमेटरी, एंटी-डायबिटिक गुणधर्म असतात. विलायती चिंचेला हिंदीमध्ये जंगल जिलेबी असे म्हणतात. आज आपण विलायती चिंच खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे जाणून घेणार आहोत.

विलायती चिंचेमध्ये असणारे पोषक घटक रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यासाठी उपयोगी असतात. म्हणूनच ज्यांना डायबेटीस हा आजार आहे ते थोड्या प्रमाणात विलायती चिंचेचे सेवन करू शकतात. विलायती चिंचेच्या सेवनाने मूतखड्याचा त्रास कमी व्हायला मदत मिळते.

बद्धकोष्ठता, अतिसार आणि गॅस यांसारख्या पोटाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी आपण विलायती चिंचेचे सेवन करू शकता. नियमित विलायती चिंच खाल्याने कॅ’न्सर होण्याची शक्यता कमी होते.

विलायती चिंचेच्या सेवनाने त्वचा उजळ होते, चेहऱ्यावरील काळे डाग नाहीशे होतात. चेहऱ्यावरील मुरुम कमी होतात. एवढेच काय चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतात.

दाढ दुखी, दात दुखत असल्यावर विलायती चिंच खाल्याने वेदना कमी व्हायला मदत मिळते. विलायती चिंचेमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट प्रमाणे काम करून  आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतो.

नियमित विलायती चिंच खाल्याने त्वचा रोग बरे व्हायला मदत मिळते. आपल्याला विलायती चिंच खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page