जांभूळ हे लहान मुलांपासून ते ज्येष्ठांचे आवडते फळ आहे. जांभळामध्ये भरपूर पोषक तत्व असतात; जे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी, पचन संतुलित ठेवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी जांभळाचे सेवन करणे फायदेशीर असते.
मात्र आज आपण जांभूळ खाल्यानंतर कोणते पदार्थ लगेच खायचे नसतात याविषयी जाणून घेणार आहोत. जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा. कारण जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने जुलाब होऊ शकतात. त्यामुळे जांभूळ खाल्ल्यानंतर 30 ते 40 मिनिटांनीच पाणी प्या.
जांभळाचे सेवन रिकाम्या पोटी करू नका. रिकाम्यापोटी जांभळाचे सेवन केल्याने एसिडीटी, पोटदुखी आणि पोटात जळजळ होऊ शकते. जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नये, जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच दूध प्यायल्याने विशेषत: गॅस, अपचन आणि पोटदुखी यांसारख्या पचनाशी संबंधित समस्या होण्याची शक्यता असते.
जांभूळ खाल्यानंतर लगेच लोणच्याचे सेवन करु नये. जांभूळ खाल्यानंतर लोणचे खाल्यानंतर पोटदुखी होऊ शकते. जांभूळ खाल्यानंतर लगेच कडू पदार्थ खाणे टाळा जांभूळ खाल्यानंतर लगेच कडू पदार्थ खाल्याने मळमळ, उलट्या होऊ शकतात.
आपल्याला जांभूळ खाल्ल्यानंतर कोणकोणते पदार्थ खाणे वर्ज्य आहे याविषयीची हि माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर कमेंट नक्की करा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.