स्वयंपाकघरातील जळलेली भांडी चमकण्यासाठी 3 उपयोगी टिप्स

स्वयंपाकघरात काम करत असताना एकावेळी अनेक गोष्टी कराव्या लागतात; यामुळे बऱ्याचदा असे घडत की मोठ्या आचेवर गॅस सुरु असतो. गॅसवर ठेवलेले भांडे जळते. जळलेले भांडे परत पहिल्यासारख करण्यासाठी आज आम्ही आपल्याला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

जळलेले भांडे परत पहिल्यासारख करण्यासाठी जळलेल्या भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा, दोन चमचे लिंबाचा रस आणि दोन कप गरम पाणी घाला. 10 मिनिटे राहूद्या. आता स्टीलच्या स्क्रबरने भांडे चांगले घासून घ्या. असे केल्याने भांडे परत पाहिल्यासारखे चमकदार होईल.

जळलेले भांडे परत पहिल्यासारख करण्यासाठी आपण हा सोपा उपाय नक्की करून बघू शकता यासाठी जळलेल्या भांड्यात 3 चमचे मीठ टाका त्यानंतर भांडे पाण्याने भरून साधारण 5 मिनिटे उकळवा. नंतर डिशवॉशर स्क्रबर किंवा ब्रशने डाग साफ करा. यामुळे जळलेल्या खुणा साफ होतील.

जळलेल्या भांड्यात एक कांदा कापून टाका त्यामध्ये पाणी मिसळून उकळवून घ्या. नंतर डिशवॉशर स्क्रबर डाग साफ करा. ह्या उपायाने डाग लवकर निघायला मदत होते.

जळलेले भांडे परत पहिल्यासारख करण्यासाठी जळालेल्या भांड्यात 2-4 चमचे टोमॅटोचा रस आणि गरम पाणी मिसळा. दहा मिनिटे राहूद्या नंतर हलक्या हाताने चोळून स्वच्छ करा. असे केल्याने भांडे परत पाहिल्यासारखे चमकदार होईल.

आपल्याला स्वयंपाकघरातील जळलेली भांडी चमकण्यासाठी 3 उपयोगी टिप्स हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page