शरीरावरील जखमेच्या खुणा, डाग, चट्टे घालवण्यासाठी उपाय

लहान मुले खेळताना पडतात त्यांच्या हाता पायाला खरचटत, जखम होते. ह्या जखमांवर मलम, लेप लावले कि जखम बरी होते. मात्र ज्या ठिकाणी जखम झाली होती त्या ठिकाणी जखमेची चट्टा पडल्यासारखे दिसते. म्हणूनच आज आपण असे काही घरगुती उपाय समजून घेणार आहोत ज्यांच्या मदतीने आपण जखमेच्या खुणा आणि चट्टे घालवू शकता.

जखमेच्या जखमेच्या खुणा घालवण्यासाठी ज्या ठिकाणी जखम झाली होती त्या भागावर कोरफड पान मधोमध कापून रात्री झोपताना बांधा. जखमेच्या डागावर कोरफड पान बांधल्याने काही दिवसातच डागाचा रंग फिकट होऊन डाग नाहीसा होईल.

जखमेच्या खुणा, चट्टे घालवण्यासाठी 15 दिवस काकडीची पेस्ट बनवून जखमेच्या डागांवर लावा. काकडी आरोग्यासोबतच त्वचेसाठीही खूप फायदेशीर असते. काकडीच्या रसामुळे त्वचा मऊ आणि हायड्रेट होते. काकडीची पेस्ट लावल्याने त्वचा मॉइश्चरायझर देखील होईल.

जखमेच्या खुणा नाहीश्या होण्यासाठी लिंबाचा रस कापसावर घेऊन अर्धा तास जखमेच्या डागावर बांधा;  अर्ध्या तासानंतर ती जागा स्वच्छ पाण्याने धुवा. हा उपाय दिवसातून एकदा साधारणपणे 15 दिवस करा.

व्हिटॅमिन ई कॅप्सूल कापून त्यामधील लिक्विड जखमेच्या खुणेवर लावून 10 मिनिटे मालिश करा. असे केल्याने आपल्या त्वचेला पोषण मिळून त्वचेवरील डाग नाहीशे होतात.

रात्री झोपायच्या आधी जखमेच्या डागावर नारळाच्या तेलाने मसाज केल्याने देखील त्वचेवरील डाग नाहीशे होतात. जर आपल्या चेहऱ्यावर जखमेचे डाग असतील तर ते घालवण्यासाठी एक चमचा चंदन पावडर, थोडेसे गुलाबजल आणि २ चमचे दूध चांगले मिसळून डागावर लावा. कमीतकमी 1 तास झाल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. असे केल्याने हळूहळू डाग कमी होऊ लागतात.

जखमेचे डाग घालवण्यासाठी बटाट्याचे मध्यम आकाराचे गोल कापून घ्या. आता डागावर बटाट्याचा कापलेला भाग हलक्या हाताने चोळा. जो पर्यंत जखमेच्या खुणा नाहीश्या होत नाही तो पर्यंत दररोज किमान एकदा हा उपाय करा.

आपल्याला शरीरावरील जखमेच्या खुणा, डाग, चट्टे घालवण्यासाठी उपाय हि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर शेयर करा. आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी हे फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page