itihaskar vichar shivajiraje

विदेशी इतिहासकारांचं छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या बद्दलचे विचार काय आहेत माहीत आहे का?

Itihas

छत्रपती शिवाजी महाराजांच नाव भारतातच नव्हे तर जग भर घेतलं जातं त्याचं उत्तम उदाहरणं म्हणजे देशा विदेशातील लोकांनी, प्रवाश्यांनी आणि इतिहासकारांनी शिवरायांच्या बद्दल लिहून ठेवलेल्या नोंदी. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी माणसासाठी जेवढा जिव्हाळ्याचा विषय आहे तेवढीच अभिमानाची देखील गोष्ट आहेच.

शिवाजी महाराज जेवढे आपल्याला जितके ओळखीचे आहेत तितकेच ते जागतिक पातळीवर त्याचं श्रेष्ठत्व विदेशी इतिहासकारांनी आणि प्रवाशी लोकांनी लिहून ठेवलं आहे. विशेष म्हणजे यातील बरेचसे शिवरायांच्या विरोधात उभे होते आणि त्यांच्या सोबत युद्ध झालेले योद्धे आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ लोटून जवळपास साडे तीनशे पेक्षा जास्त वर्षं लोटली तरीही त्यांचे इतिहासातील सुवर्ण पान अजूनही आकाeशातल्या ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ आहे. बघुयात मग जागतिक स्तरावर शिवरायांचा बोलबाला कसा आहे.

अबे कॅरे हा १६७२ ते १६७४ दरम्यान भारत भ्रमंतीवर आलेला एक फ्रेंच प्रवाशी होता. ते ज्यावेळी भारतात आला होते तेंव्हा छत्रपतीआवशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडत होता. ते तत्कालीन नोंदी मध्ये असं म्हणतात.

शिवाजी राजे पुर्वेने पाहिलेल्या उत्तमातील उत्तम योद्ध्यांपैकी एक म्हणून त्यांची गणना होऊ शकते आहेत. त्यांच्या युध्दातील चपळाईमुळे आणि धाडसी निर्णयांमुळे व इतर गुणांमुळे त्यांची तुलना स्विडनच्या महान राजा ऍडॉल्फसशी होऊ शकते. त्यांच्या जलद गतीने आणि प्रजे च्या प्रति असलेल्या प्रेमामुळे ज्युलियस सीझरप्रमाणे त्यांनी त्यांच्या शत्रूंचीही मने जिंकली.

जेम्स डग्लस हा ब्रिटिश प्रवाशी म्हणतो कुठल्याही संकट काळी अगदी  आणीबाणीच्या प्रसंगात देखील शिवाजी राजे हे संयमी राहून अश्या संकटांना सहजपणे तोंड दिले. महाराजांचं व्यक्तिमत्त्व च प्रेरणादायी आहे. त्यांच्या प्रेमळ आणि जादुई स्पर्शाने गरीब, आज्ञाधारक, दैववादी विचारांच्या महाराष्ट्रातील जनतेला अलौकीक कृत्ये करण्यास प्रेरीत केले प्रसंगी त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राणांची बाजी लावली. ही साधारण आणि सामान्य जनतेचे सर्वोत्तम सैनिक, विश्वासू सरदार, कुशल राजनितीने विशारद निर्माण केले त्याच जनतेने शेकडो युध्दे जिंकलेल्या मुघलांचा सामना सहजपणे केला.

रॉबर्ट ओर्मी हा ब्रिटिश इतिहास अभ्यासक आहे तो म्हणतो, शिवाजी महाराजांकडे एका यशस्वी सेनापती होण्यासाठी जे जे सर्व गुण होते. सैन्याचा प्रमुख म्हणून त्यांनी युद्धभूमीवर जितके अंतर पार केले तितके अंतर क्वचितच जगातील दुसऱ्या कोणत्या सेनापतीने केले असेल. आणीबाणीचा प्रसंग असो किंवा कोणत्याही आकस्मिक संकट आलं असलं तरीही शिवाजी राजांनी त्याचा विवेकाने व धैर्याने यशस्वीपणे सामना केला.

जॉन सर्विलन  हा अमेरिकन युद्धातील तरबेज सेनापती म्हणतो ज्या काळात शिवाजी महाराज रहात होते त्या काळात सफल होण्यासाठी गरजेचे प्रत्येक गुण त्यांच्यामधे होते. ते प्रत्येक वेळी सतर्क असायचे आणि त्यांची प्रत्येक कृती प्रखर व भयंकर धाडसी असायची.

हे जितके धाडसी होते तितकेच ते सहनशील ही होते, आणि त्याच्या याच गुणवैशिष्ट्यांमुळे जगाच्या पाठीवर कोठेही आणि कुठल्याही काळात त्यांच्याकडून गौरवास्पद कार्य झालेच असते. शिवाजी राजे आणि त्यांचे मावळे गनिमी काव्यामुळे त्याकाळाचे जगातील सर्वोत्तम होते.

डॉ. जॉन एफ. जी. कार्अरी असे म्हणतात की शिवाजी राजे इतके बलाढ्य आहेत की ते एकाच वेळी प्रचंड शक्तिशाली असलेल्या मुघलांबरोबरही लढतात आणि जग जिंकलेल्या पोर्तुगिजांबरोबरही लढतात. ते रणांगणावर ठराविक संख्येने घोडदळ आणि पायदळ आणतात ज्यात पायदळ सैनिकांची संख्या घोडदळ पेक्षा जास्त असायची.त्यांचे सैनिक हे इतर कोणत्याही सैनिकापेक्षा कित्तीतरी पट्टीनी निष्ठावंत आहेत. हे सैनिक अतिशय थोड्या अन्नावर देखील कित्येक दिवस काढू शकतात.

स्वॉट असे म्हणतात शिवाजी राजे एक योध्दा म्हणून असामान्य होते, एक राज्यकर्ता म्हणून निपुण आहेतच तर सद्गुणी आणि प्रचंड विश्वासू लोकांचे मित्र होते. त्यांनी हुशारीने आपली धोरणे आखली तर तत्परतेने अमलात आणले ज्यात त्यांना त्यांच्या मित्रांनी खूप साथ दिली.

सिडनी जे. ओवेन  हा लेखक म्हणतो शिवाजी राजे त्यांच्या लोकांमध्ये वीरता, देशाभिमान, धर्माभिमानाची ज्योत रुजवली. त्यामुळे सामान्य जनतेच्या दृष्टीने शहाजी राजांच्या पुत्रास ते दैवाचा अवतार मानतात. त्याच्या दृष्टीने शिवाजी महाराज संकट हरणारे आहेत त्यांच्या नावाची ताकद तेवढी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *