हृदयविकाराचा झटका येण्याआधी ही 5 लक्षणे दिसतात

आपण स्वस्थ आणि निरोगी राहाव अस आम्हाला वाटत; म्हणूनच आम्ही नियमितपणे आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती घेऊन येत असतो. आज आपण हृदयविकाराचा झटका यायच्या आधी कोणकोणती लक्षणे दिसतात; ते जाणून घेणार आहोत. हि माहिती महत्वपूर्ण असणार आहे; त्यामुळे संपूर्ण माहिती वाचून झाल्यावर आपल्याला माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.

आजकाल आपल्याला प्रत्येक जण धावपळ करताना दिसतो. ह्या तंत्रज्ञानाच्या युगात धावपळ करण्याशिवाय पर्याय नाही. हे आपल्याला माहितच आहे. मात्र कामाच्या ह्या धावपळीत आपल्या नकळतपणे आपण आरोग्याकडे थोड दुर्लक्ष करतो.

मग याचाच परिणाम आपल्याला उतार वयात दिसायला लागतो. उतारवयात बऱ्याच जणांना सांधेदुखी, डायबेटीस, कोलेस्ट्रोल, ब्लडप्रेशर आणि ह्रदयविकार होताना दिसतात.

हे असे आजार होण्याआधी आपल्या शरीरात काही बदल होत असतात. हे बदल म्हणजेच या आजारांची लक्षणे आपल्याला आधीपासून माहित असतील तर आपण या आजारांच्या सुरुवातीलाच योग्य उपचार घेऊन बरे होऊ शकतो. म्हणूनच आज आपण हार्ट अटॅक येण्याआधी कोणकोणती लक्षणे दिसतात हे थोडक्यात समजून घेऊयात.

थोडेसे काम केल्याने खूप थकवा येणे; अचानक खूप घाम येणे, चक्कर आल्यासारखे वाटणे, हृदय जोराजोराने धडधडू लागणे, धाप लागणे, श्वास घेताना त्रास होणे, जेव्हा हृदय योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा श्वास घ्यायला अडचण येते.

याशिवाय सारखच छातीत दुखायला लागत. हात पाय जड पडतात अशा वेळी घाबरून न जाता ताबडतोब तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. कारण हि सगळी  हृदयविकाराच्या झटक्याची लक्षण असू शकतात. वेळीच उपचार घेतले तर आजार बरे होऊ शकतात.

जर आपल्याला निरोगी राहायचं असेल तर योग्य आहार निवडा कारण जसा आहार आपण खातो तसेच आपण बनतो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट नियमित व्यायाम करायची सवय स्वताला लावा. तणावमुक्त राहायचा प्रयत्न करा.

आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याआधी कोणकोणती लक्षणे दिसतात हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page