हृदयरोग टाळण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये हे बदल आजपासूनच करा

हृदयरोग टाळण्यासाठी आपल्या आहारात आणि जीवनशैलीमध्ये कोणकोणते बदल केले पाहिजेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत हि माहिती महत्वाची असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या मित्रांसोबत शेयर करा.

वजन वाढलेले असल्यास त्यामुळे हृदयविकार होण्याचा धो’का असतो त्यामुळे आपले वजन प्रमाणापेक्षा जास्त असल्यास ते कमी करण्यासाठी दररोज सकाळी 30 मिनिटे चालायला जायची सवय स्वताला लावा.

चालल्याने, धावल्याने, पोहल्याने वजन कमी व्हायला मदत मिळते. चालायला जायला जमत नसेल तर घरच्या घरी योगा करा, दोरी उड्या मारा. व्यायाम केल्याने वजन कमी होऊन धमन्यांमध्ये जमा झालेले कोलेस्ट्रोल कमी होईल.

नियमित थोडा तरी व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुधारून हृदय मजबूत व्हायला मदत मिळेल. हृदय निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारातील तेलकट, चरबीयुक्त पदार्थ, मैद्याचे पदार्थ अशा गोष्टी कमी करा.

हृदय निरोगी राहण्यासाठी सात्विक आहार घ्यायला सुरुवात करा. सात्विक आहार म्हणजे आपल्या घरचे साधे जेवण. जेवणामध्ये असणारे मिठाचे आणि साखरेचे प्रमाण कमी करा.

मानसीक तणाव घेतल्याने रक्तदाब वाढतो त्यामुळे शक्य तितका मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, सतत चीडचीड केल्याने मानसीक तणाव वाढतो त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवायला शिका. सकाळच्या वेळी काही वेळ ध्यान केल्याने, अनुलोम विलोम, कपालभाती सारखे श्वासांचे व्यायाम केल्यास राग, चीडचीड आणि तणाव कमी व्हायला मदत मिळते.

आम्हाला आशा आहे कि हृदयरोग टाळण्यासाठी आहारात आणि जीवनशैलीमध्ये कोणकोणते बदल केले पाहिजे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंट करून नक्की सांगाल. अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page