हृदयविकाराचा झटका येण्याआधी कोणती लक्षणे दिसतात?

आपल्यालाला हृदयविकाराचा झटका ह्या आजाराबद्दल जास्त काही माहित नसत. आपल्या आजूबाजूच्याला हार्ट अटॅक येतोय हे समजण्यासाठी आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याआधी कोणकोणती लक्षणे दिसतात हे माहित असणे गरजेच आहे. हृदयविकाराचा झटका येण्याआधी कोणकोणती लक्षणे दिसतात हे आपल्याला आधीपासून माहित असल्यास आपण वेळेत रुग्णाला दवाखान्यात नेऊ शकाल आणि रुग्णाचा जीव वाचवू शकाल.

हृदयविकाराचा झटका येण्याआधी छातीत तीव्र वेदना व्हायला लागततात. ह्या वेदना खांद्यापर्यंत होत असतात. हे हृदयविकाराचे पहिले लक्षण आहे. अशावेळी आपण त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेच आहे. अशावेळी थोडासा निष्काळजीपणासुद्धा तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका.

आपल्याला अचानक श्वास घ्यायला त्रास होत असेल ते हृदयविकाराचा झटका येण्याचे लक्षण असू शकते. जेव्हा आपले हृदय योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा श्वास घेण्यास अडचण येऊ शकते.

हृदयरोगात आपले हृदय खूप कमकुवत होते त्यामुळे रक्त परिसंचरण क्रिया व्यवस्थित होत नाही आणि ऑक्सिजन आपल्या मेंदूपर्यत पोहोचत नाही, ज्यामुळे आपल्याला चक्कर यायला लागते. वरती दिलेल्या लक्षणासोबतच अचानक आपल्याला जास्त प्रमाणात घाम येऊ शकतो.

जेव्हा अचानक हार्ट अटॅकची आल्यासारखे वाटते, तेव्हा आपले हृदय जोराने धडधडू लागत, यामुळे वेगळ्या प्रकारचे भय निर्माण होऊन हार्ट बीटचा वाढतो.

वरती दिलेली सर्व लक्षणे सामान्य व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी दिसून येतात. आपल्या आजुबाजुच्याला अशी काही लक्षणे दिसली तर त्यांना त्वरीत जवळच्या डॉक्टरांकडे घेऊन जा.

आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याआधी कोणती लक्षणे दिसतात? हि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा;  अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page