आपल्या चेहऱ्याची त्वचा खूप संवेदनशील असते. आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा प्रदूषणाचा, धूळीचा, उन्हाचा आपल्या त्वचेवर परिणाम होत असतो. म्हणूनच आपण आपल्या चेहऱ्याची सतत काळजी घेतली पाहिजे.
उन्हाळ्यात कडाक्याच्या उन्हामुळे त्वचा जळते, लालसर दिसू लागते. काळवंडते, चेहरा सावळा दिसू लागतो; यालाच सन टॅन अस म्हणतात. आज आपण सन टॅन घालवण्यासाठी काही घरगुती उपायांची माहिती घेणार आहोत.
चेहऱ्यावरील सन टॅन घालवण्यासाठी हा सोपा उपाय आपण नक्की करून बघू शकता यासाठी. एका वाटीत थोडे दही घ्या, त्यात चमचाभर हळद पावडर मिसळून पेस्ट बनवा. आंघोळीच्या 20 मिनिटे आधी ही पेस्ट टॅन झालेल्या त्वचेवर लावा. काही दिवस हा उपाय केल्याने टॅनिंग कमी होऊन आपली त्वचा परत पूर्वीसारखी तजेलदार होईल.
चेहऱ्यावरील सन टॅन घालवण्यासाठी आपण टोमॅटोचा वापर करू शकता यासाठी चांगला पिकलेला टोमॅटो कापून त्याचे दोन तुकडे करा आणि त्याचा आतील भाग टॅन झालेल्या त्वचेवर हलक्या हाताने घासा. असे केल्याने टॅनिंग कमी होऊन आपला चेहरा उजळ दिसू लागेल.
सन टॅन घालवण्यासाठी आपण अंघोळीच्या 20 मिनिटे आधी आपल्या चेहऱ्यावर ताक लावून हलक्या हाताने मालिश करा. ताकामधील पोषक घटकामुळे आपली त्वचा उजळ दिसू लागेल.
सन टॅनिंग पासून वाचण्यासाठी उन्हात जास्त बाहेर पडू नका. जर आपल्याला उन्हात बाहेर जावे लागणार असेल तर एसपीएफ १५ ते ३० असलेले सनस्क्रीन वापरा. चेहरा सुती कपड्याने झाकून मग बाहेर पडणे सगळ्यात उत्तम राहील.
घसादुखी थांबण्यासाठी आपण जेष्टमधाची काडी चघळू शकता. जेष्टमधाची काडी चघळल्याने खोकला देखील कमी व्हायला मदत मिळते. आपल्याला उन्हाळ्यात चेहऱ्यावर येणारे सन टॅन घालवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.