हिवाळ्यात अनेकांच्या नखांचा रंग पूर्णपणे बदलतो आणि नख निळे पडतात. तुमच्या नखांचा रंगही वारंवार बदलत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण कधी कधी हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असते. नखांचा जांभळा किंवा निळा रंग हे तुमचे शरीर आतून निरोगी नसल्याचे लक्षण असू शकते.
आपल्या शरीरात लाल रक्तपेशींमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक वेळा नखांचा रंग निळा होतो. लाल रक्तपेशींमध्ये ऑक्सिजनची कमतरता हा एक प्रकारचा आजार आहे. ज्याला सायनोसिस म्हणतात. सायनोसिस आजारात, पुरेश्या प्रमाणात ऑक्सिजन रक्तापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे नखांची त्वचा निळी पडते.
नखे निळे पडणे, श्वास लागणे, धाप लागणे, आणि छातीत दुखणे हि देखील सायनोसिस आजार असण्याची लक्षणे आहेत. त्यामुळे आपल्या नखांचा रंग निळा होत असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
न्यूमोनिया आजार झालेला असल्यास देखील नखांचा रंग निळा पडतो. न्यूमोनिया आजारामुळे रुग्णाला खूप ताप येतो आणि नखांचा रंग बदलतो. म्हणूनच ज्या लोकांना खूप ताप येतो आणि त्यांची नखे निळी पडतात, त्यांनी डॉक्टरांकडून न्यूमोनियाची तपासणी करून घ्यावी.
काही वेळा हात-पायातील रक्तवाहिन्यामध्ये गाठी झाल्यामुळे हात-पायांपर्यंत रक्त नीट पोहोचत नाही आणि असे झाल्यावर देखील नखांचा रंग निळा होतो.
आपल्याला हिवाळ्यात नख निळे पडणे कोणत्या आजारांचे लक्षण असू शकते हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.