हिवाळ्यात तेलकट त्वचा असलेल्यांनी जास्त काळजी घेणे गरजेचे असते. थंडीमध्ये तेलकट त्वचा असणाऱ्यांचा चेहरा जास्तच काळपट दिसतो. तसेच चेहऱ्यावर तेलकटपणा असल्याने मुरूम हि येतात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये तेलकट त्वचा असणाऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. आज आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत.
तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी जास्त पाणी प्यावे. पाणी पिणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. त्वचेचा पोत सुधारण्याचा असेल तर पाणी पिणे महत्वाचे आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जास्त पाणी प्यायल्यास चेहरा तजेलदार दिसतो. तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी ही विशेष काळजी घेतली पाहिजे.
त्वचा तेलकट असेल तर स्क्रब करणे गरजेचे आहे. त्यामुळे तेलकटपणा कमी होतो. या हंगामांमध्ये येणारे फळ, भाज्या, ड्रायफ्रूट खाणे त्वचेसाठी फायदेशीर असते. त्यामुळे गाजर, मेथी, लिंबू या गोष्टींचा समावेश करा. त्यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिकरीत्या ग्लो येईल.
आपली त्वचा कोरडी असो अथवा तेलकट असो कोरफड हे त्वचेच्या कोणत्याही समस्येवर चांगला उपाय आहे. त्यामुळे कोरफडीचा गर त्वचेवर लावा. त्वचेला आद्रता देण्यासाठी आणि संरक्षणात्मक स्तर तयार करण्यासाठी कोरफड फायदेशीर आहे. त्यामुळे तुमची त्वचा ताजीतवानी दिसेल.
चेहरा तेलकट दिसू नये यासाठी कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि गुलाबजलमध्ये लिंबू रस मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. त्यामुळे तेलकट असलेला चेहरा काळा पडत नाही.
थंडीच्या दिवसात चेहऱ्यावरील तेलकटपणा घालवण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करा. यासाठी थोड्याश्या कापसावर गुलाब पाणी घ्या. ते आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. 30 मिनिटे तसेच राहुद्या नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. आपल्याला हिवाळ्यात तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.