मधुमेह, रक्तदाब यावर रामबाण उपाय. हिवाळ्यात तीळ खाण्याचे फायदे.

स्वभावाने गरम पण आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असणारा तीळ हा पदार्थ आपल्या घरामध्ये सहजपणे आढळून येतो. विशेषतः हिवाळ्यात – थंडीच्या दिवसांमध्ये तिळाचे सेवन आपल्याला अधिक लाभदायी ठरते. चला तर मग जाणून घेऊयात हिवाळ्यात तीळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

रोज नियमित साधारण चाळीस – पन्नास ग्रॅम तीळ रात्री चावून खावेत आणि नंतर पाणी प्यावेत. यामुळे दात पक्के आणि मजबूत होण्यास मदत होते.

हाडे बळकट करण्यासाठी आपण तीळाचे सेवन करायला हवे त्याचप्रमाणे शरीरातील ऊर्जा नियंत्रित ठेवण्यासाठी देखील तीळ फायदेशीर आहे.

मुळव्याधाने आपण जर त्रस्त असाल तर साधारण ५० ग्रॅम काळे तीळ थंड झालेल्या वरणा बरोबर नियमित सेवन केल्यास मूळव्याध बरा होण्यास मदत होते.

जास्त वेळा लघवी होणे या विकाराने त्रस्त असाल तर तीळ भाजून त्यात गूळ घालून लाडू करावे आणि त्याचे सकाळ – संध्यकाळ सेवन केल्यास यावर आळा बसतो. तिळामध्ये पोट साफ करण्याचे देखील वैशिष्ट्य असून पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील तिळाची मदत होते.

केसात कोंडा होणे या समस्येमुळे जर आपण त्रस्त असाल तर तिळाच्या तेलाचा वापर करणे लाभदायक ठरते. मधुमेह दूर करणे त्याचप्रमाणे रक्तदाब कमी करणे यासाठी देखील तीळाचे सेवन करणे उपयुक्त ठरते.

स्त्रियांनी तिळाचे सेवन जरूर करावे. तीळ भाजून बारीक करून सेवन केल्यास मातेला दूध जास्त येते. काही प्रमाणात तीळ आणि ओवा एक किलो पाण्यात टाकून त्याचा काढा करावा.

थोडं पाणी आटल्यावर गूळ घालून याचे सेवन जर आपण केलेत तर मासिकपाळीचा त्रास कमी होतो. आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आम्हाला आपली प्रतिक्रिया जरूर द्यावीत. असेच लेख वाचत राहण्यासाठी आम्हाला भेट देत राहा.

Leave a Comment

You cannot copy content of this page