हिवाळ्यात आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आपल्या आहारात फळांचा समावेश असणे खूप गरजेच असते. हिवाळ्यात थंड वातावरण असल्याने तहान फार लागत नाही.
त्यामुळे आपण पाण्याचे सेवन कमी प्रमाणात करतो. आपल्या शरीराची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी देखील काही फळ आज आम्ही आपल्याला सुचवणार आहोत.
आम्हाला आशा आहे कि आपण संपूर्ण माहिती वाचल्यानंतर आपल्याला माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगाल. तर जास्त वेळ न घेता आपण मुख्य विषयाकडे म्हणजेच हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोणकोणती फळ खाल्ली पाहिजेत? या विषयी जाणून घेऊयात.
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आपण आहारात सिताफळ ह्या फळाचा समावेश करू शकता; सिताफळ हे पचायला हलके असणारे फळ असल्याने लहानापासून वृद्धांपर्यंत सगळेच हे फळ खाऊ शकतात.
सिताफळामध्ये अँटीऑक्सिडंट्स, विटामिन बी, विटामिन सी, कॅल्शियम, लोह असे पोषक घटक असतात. सिताफळ खाल्याने शरीरातील अशक्तपणा कमी व्हायला मदत होते.
थंडीच्या दिवसात निरोगी राहण्यासाठी आपण संत्री खाऊ शकता. संत्र्यामध्ये विटामिन सी आणि फायबर घटक मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत मिळते. तसेच ह्या फळाचा आहारात समावेश केल्याने हिवाळ्यात आपली त्वचा देखील फुटत नाही; शरीरातील कोलेस्ट्रोल पातळी संतुलीत राहते.
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आपण आहारात स्ट्रॉबेरी ह्या फळाचा समावेश केला पाहिजे कारण स्ट्रॉबेरीमध्ये विटामिन सी आणि विटामिन बी हे पोषक घटक असतात. शिवाय स्ट्रॉबेरी हे फळ डायबेटीज असलेले सुद्धा खाऊ शकतात.
कारण स्ट्रॉबेरी खाल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित व्हायला मदत मिळते. तसेच स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स घटक मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगली असते.
थंडीच्या दिवसात निरोगी राहण्यासाठी आपण अंजीर हे फळ खाऊ शकता. अंजीरामध्ये कॅल्शिअम हा पोषक घटक असतो ज्यामुळे आपली हाडे मजबूत होतात.
तसेच अंजीर हे फळ पुरुषांसाठी खूप चांगले असते; यामधील पोषक तत्वांमुळे स्पर्म काऊंट वाढायला मदत मिळते. या फळाशिवाय अननस, चिकू, मोसंबी, पपई हि फळे आपण हिवाळ्यात खाऊ शकता.
आपल्याला “हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोणकोणती फळ खाल्ली पाहिजेत” हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.