हिरड्यांना सूज येणे घरगुती उपाय

रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ न केल्यामुळे अनेकदा हिरड्यांना सूज येते, दातामध्ये कीड होते. दातांची स्वच्छता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. गावाकडे अनेकांना मिश्री लावण्याची सवय असते. तसेच तरुण पिढीमध्ये मोठ्याप्रमाणात मा’वा, गु’टखा खाण्याचे प्रमाण असते. यामुळे तुमच्या हिरड्यांना सूज येते.

व्यसनामुळे जंतू दातांमध्ये तसेच साचून राहतात आणि यामुळेच आपल्या हिरड्यांना सूज येण्याची दाट शक्यता असते. आपल्या शरीरात विटामिन सी ची कमतरता असल्यास आपल्या हिरड्यांना सूज येऊ शकते. हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी आपण हे घरगुती उपाय करू शकता.

रात्री जेवल्यानंतर नियमित दात घासून झोपले पाहिजे. त्यामुळे दातांमध्ये अडकलेले अन्नपदार्थ स्वच्छ होतात. जर आपण दात न घासता झोपले तर दातामधील अन्नपदार्थ कुजून त्याद्वारे तुमच्या हिरड्यांना इजा होऊ शकते आणि सूज येऊ शकते.

हिरड्यांना सूज येणे हे बऱ्याचदा शरीरामध्ये विटामिन सी ची कमतरता असल्यामुळे येते. विटामिन सी ची कमतरता भरून काढण्यासाठी आपण हिरव्या पालेभाज्या, लिंबू, संत्री, आवळा अशा पदार्थांचे सेवन करू शकता.

रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून त्या पाण्याने नियमित गुळण्या केल्याने हिरड्यांवर आलेली सूज कमी होते. हा उपाय आठवडाभर केल्यास लवकरच हिरड्यांची सूज कमी होईल.

नेहमीच्या आहारामध्ये कॅल्शियम युक्त गोष्टींचा समावेश करा. दूध, पनीर अशा पदार्थांचा वापर आपल्या रोजच्या जेवणामध्ये करा. त्यामुळे हिरडयांचे आजार होणार नाही. दुधामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात कॅल्शियमचा पुरवठा होतो त्यामुळे नियमित दूध प्या.

पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा. भरपूर पाणी पिल्याने नैसर्गिक माऊथवॉश होते. त्यामुळे हिरड्या सुजणे, दात किडणे असे अनेक आजार नैसर्गिकरित्या बरे होतात. त्यामुळे नियमित पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा.

आपल्याला हिरड्यांना सूज येणे घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असल्यास आम्हाला मेसेज किंवा इमेल करा.

Leave a Comment

You cannot copy content of this page