शरीरातील हिमोग्लोबीनची कमी कशी ओळखतात?

आपल्या शरीरात असणारा हिमोग्लोबीन हा सर्वांत महत्वाचा घटक आहे. शरीरातील रक्त कोशिकांमध्ये असणाre लोहयुक्त प्रोटिन म्हणजे हिमोग्लोबीन होय. आपल्या शरीरातील ऑक्सिजनच्या प्रवाहाला संतुलित करण्याचे काम हे प्रोटीन म्हणजेच हिमोग्लोबिन करत असते.

हिमोग्लोबीन मधील हेम म्हणजेच लोह आणि ग्लोबिन हे प्रोटीन घटक असतात, आपल्या आहारातून लोह घटक असलेल्या अन्नपदार्थांची कमतरता असते तेव्हा आपल्या शरीरात हिमोग्लोबीनची पातळी देखील कमी व्हायला लागते. शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यावर आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी कमी व्हायला लागतात.

त्यानंतर आपोआपच आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आजारपण येण्याची दाट शक्यता असते. आपल्या शरीरात हिमोग्लोबीनची कमतरता असल्यास आपल्याला पुढील लक्षणे जाणवू शकतात.

थोडे काम केले तरी लगेच थकवा येणे, प्रचंड अशक्तपणा, सतत डोकेदुखी, चिडचिड होणे, चक्कर येणे, श्वास लागणे, चिंताग्रस्त होणे आणि हात पाय सूजणे हि आणि यासारखी लक्षणे दिसू लागतात. आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्यावर त्वचेचा मुळ रंग बदलतो.

आपली त्वचा फिकट पडते, त्वचा पांढरट दिसू लागते. आपल्या ह्रदयाला पुरेसे ऑक्सिजन न मिळाल्याने ह्रदयाचे ठोके प्रमाणापेक्षा वाढतात अथवा ह्रदयाचे ठोके प्रमाणापेक्षा कमी व्हायला लागतात.

ज्यामुळे भिती वाटणे, छातीत धडधडणे असे प्रकार सुरु होऊ शकतात. शरीरात हिमोग्लोबीनची कमतरता असल्यावर लाल रक्त पेशी कमी प्रमाणात तयार होतात,  शरीरातील रक्त कमी होणे अशा समस्या होतात.

शरीरातील हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे थकवा आणि अशक्तपणा आलेला असतो. ह्या अवस्थेलाच अशक्तपणा म्हणतात. खरतर अशक्तपणा हा काही कोणता आजार नाही, परंतु तो निश्चितपणे बऱ्याचश्या आजारांचे कारण बनू शकतो.

विशेषत: किरकोळ तब्येत असणाऱ्या महिलांना गर्भधारणेच्या दरम्यान ह्या गोष्टींना सामोरे जावे लागते. स्त्रियांमध्ये गर्भधारणेदरम्यान अशक्तपणा येतो.

कारण ग’र्भधारणेदरम्यान ग’र्भाच्या विकासासाठी त्यांच्या शरीरात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरची जास्त प्रमाणात आवश्यकता असते. मात्र ग’र्भवती स्त्रियांच्या रक्तामध्ये लोहाची मात्रा कमी झाल्याने त्यांना थकवा आणि अशक्तपणा जास्त जाणवू शकतो. आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असले पाहिजे.

निरोगी पुरुषांच्या शरीरात १४ ते १८ ग्रॅम / १०० मिली इतके हिमोग्लोबिन असले पाहिजे. तर निरोगी स्त्रियांच्या शरीरात  ही मात्रा १३ ते १५ ग्रॅम / १०० मिली इतकी असली पाहिजे. लहान मुलांच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण सुमारे १४ ते २० ग्रॅम / १०० मिली इतके असते.

आपल्या शरीरात हिमोग्लोबीनची पातळी कमी असल्यास हिमोग्लोबीनची पातळी वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय. आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवायचे असल्यास आपण दररोजच्या आहारात बीटरुट चा समावेश करू शकता. बीटरूट हिमोग्लोबीनची पातळी वाढवण्यासाठी हा सर्वात चांगला पर्याय आहे.

कारण बीटामध्ये आयर्न, फॉलिक एसिड, फायबर आणि पोटॅशियम हे सर्व आवश्यक घटक योग्य प्रमाणात असतात. यासोबतच पालक, राई, हिरवे वटाणे, मेथी, कोथिंबीर, पुदिना आणि टमाटर या गोष्टींचा देखील आपण आपल्या आहारामध्ये समावेश करू शकता.

आपल्याला शरीरातील हिमोग्लोबीनची कमी कशी ओळखतात हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page