शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे पदार्थ आजच खायला सुरुवात करा

निरोगी आरोग्यासाठी आपल्या शरीरामध्ये सर्व पोषक घटकांचे प्रमाण संतुलित असणे गरजेच असत. रक्तात असणाऱ्या  हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यास अनिमिया हा आजार होतो. आपल्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास आपल्याला लवकर थकवा येतो.

त्वचेचा रंग फिकट पडतो, थोड काम केल तरी दम भरून आल्यासारख वाटत, कोणतेही काम करायला उत्साह राहत नाही, केस जास्त प्रमाणात गळू लागतात, रक्तदाब कमी जास्त व्हायला लागणे अशी लक्षणे दिसून आल्यास आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन ची कमतरता असू शकते.

आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे योग्य प्रमाण आहे कि नाही हे समजून घेऊयात. निरोगी राहण्यासाठी पुरुषामध्ये 14 ते 18 मिलीग्राम आणि स्त्रीमध्ये 12 ते 16 मिलीग्राम हिमोग्लोबिन असणे गरजेच असत.

जर आपल्या शरीरात यापेक्षा कमी हिमोग्लोबिन असेल तर हि माहिती सम्पूर्ण वाचा. हि चांगली माहिती आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत पोहोचवणे त्यांना कमेंटमध्ये टॅग करायचे काम तुमचे आहे.

शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी आपण डाळिंब खायला सुरुवात करा; कारण डाळींबामध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम असे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. डाळींबाचे नियमित सेवन केल्याने लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत होते.

हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी आपण खजूर खायला सुरुवात करू शकता. खजूरमध्ये मॅंग्नेशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन बी 6, रिबोफ्लेविन यांसारखे पोषक घटक असतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट दुधासोबत खजूर खाल्याने आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होईल.

शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यासाठी आपण बीट खायला सुरुवात करा. बीट खाल्याने आपल्या शरीराला आवश्यक असणारे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फॉलिक एसिड, फायबर, मॅंगनीज, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम हे मिळू शकतात. आपल्या रोजच्या जेवणासोबत थोडेसे बीट सलाड नक्की खा. नियमित बीट खाणाऱ्यांना कधीही हिमोग्लोबिनची कमतरता होत नाही.

आहारात पालक ह्या पालेभाजीचा समावेश केल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढायला मदत होते. पालकमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. जे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते. हि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत. माहिती आवडली असेल तर पोस्ट शेयर करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page