हातावरील एक्जिमाची खाज थांबवण्यासाठी घरगुती उपाय

आपण वापरत असलेल्या केमिकलयुक्त कपड्यांच्या साबणामुळे, डिटर्जेंटमुळे तसेच स्त्रीयांमध्ये मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे अंगावर खाज येऊ शकते. साधारण पणे खाज येत असलेल्या ठिकाणी त्वचा लाल होते. आपण त्याच्यावर त्वरित उपचार केले नाही तर त्या ठिकाणी सतत खाज येते. अन् खाजवल्याने काळे डाग पडतात यालाच एक्जिमा असे म्हणतात. आज आपण जाणून घेणार आहोत. त्वचेवरील एक्जिमा (खाज) घालवण्यासाठी घरगुती उपाय.

अंगावर खाज येत असल्यास त्या ठिकाणी दिवसातून चार ते पाच वेळा कोरफडाचा गर लावा. असे केल्याने खाज येणे थांबण्यास मदत मिळेल तसेच अंगावर खाजवल्यामुळे आलेले लाल डाग हि नाहीसे होतील.

अंगाला खाज येऊ नये यासाठी कडूलिंबाची पाने पाण्यात घालून उकळवा आणि त्या पाण्याने अंघोळ करा. चांगल्या परिणामासाठी हा उपाय आपण दिवसातून दोन वेळा हि करू शकता. अंगावर खाज येत असल्यास त्या ठिकाणी शुद्ध खोबऱ्याचे तेल लावा. खोबऱ्याचे तेल लावल्यामुळे खाज कमी होण्यास मदत मिळेल.

अंगावर तीव्र खाज येत असल्यास काही कडूलिंबाची पाने वाटून त्या ठिकाणी लावल्याने हि आराम मिळेल. अंगावर खाज येत असल्यास त्या ठिकाणी हळदीचा लेप लावा असे केल्याने आपल्याला आराम मिळेल.

अंगावर खाज येत असल्यास आपल्या घराच्या जवळ समुद्र असल्यास समुद्राच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीरावरील त्वचा रोग कमी होण्यास मदत मिळते. तसेच आपल्याला येणारी खाज हि कमी होईल.

आपल्या अंगाला खाज येऊ नये यासाठी पुढील काळजी आपण घेऊ शकता. कपड्यांना साबण किंवा डिटर्जंट लावल्यानंतर आपले हात स्वच्छ धुवा. त्यावर साबण किंवा डिटर्जंटचा अंश राहणार नाही याची काळजी घ्या. तसेच कपडे नीट सुकल्यानंतरच वापरा. अंगाला खाज येत असलेल्या व्यक्तीचे कपडे वापरू नका.

आपल्याला हातावरील एक्जिमाची खाज थांबवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा;  अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page