भारतामधले इतिहासात हरवलेल विद्यापीठ

तुम्हाला ऐकायला खर वाटणार नाही जगातले पहीले विश्वविद्यालय भारतात होत चला जाणुन घेउयात त्याची माहिती आपल्या भाषेत. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात भारत हे शिक्षणाच केंद्र होत. या मधे प्रमुख तीन विश्वविद्यालये होती, या विश्वविद्यालयांमध्ये विक्रमशिला, तक्षशिला अणि नालंदा विश्वविद्यालय यांचा समावेश होतो. ही विश्वविद्यालये जगातील ज्ञानाचे केंद्र मानली जायची.

यांचा इतिहास देखील तेवढाच गौरव शाली आहे जेवढी ही विश्वविद्यालये तक्षशिला नंतर नालंदा विश्वविद्यालयाची चर्चा केली जाते. बिहारची राजधानी पटना च्या जवळ १२० किलोमीटर दक्षिण – उत्तरेला आजही आपल्याला नालंदाचे पुरातन अवशेष पहायला मिळतात.

या विद्यालायाची स्थापना गुप्त काळचा राजा, कुमार गुप्त ने केली होती. नालंदा हा संस्कृत शब्द असून नालम+दा असा आहे. संस्कृत मधे नालम च अर्थ कमळ होतो.कमळ म्हणजे ज्ञानाचे प्रतिक अणि नालम+दा म्हणजे ज्ञान देणारी, म्हनुनच याला नालंदा असे नाव देण्यात आल होत.

या विद्यालायत फक्त धर्मच शिकवला जात नव्हता तर राजनीती, इतिहास, ज्योतिष, विज्ञान हे ही विषय शिकवले जायचे. हे पाहिले असे विद्यालय होते जिथे विद्यार्थ्याच्या सगळ्या सुविधा निशुल्क केल्या जायच्या.हे विद्यालय खुप मोठ्या परिसरात बनवल गेल होत.

आत्ता पर्यंतच्या शोधकार्यात १३ मठ मिळाले असून ते एक मजली नसून अनेक मजली अणि जास्त उंची चे आहेत. विद्यालयाला चारी बाजूने संरक्षण भिंत पहायला मिळते तसेच एक मुख्य प्रवेशद्वार देखिल आहे.

केन्द्रीय विद्यालयात ७ मोठे सभागृह अनि ३०० इतर खोल्या पहायला मिळतात. प्रत्येक खोलीत एक दगडांचा ओटा झोपन्यासाठी तयार करण्यात आला आहे तसेच पुस्तकें, दिवा ठेवण्यासाठी रकाने देखील बनवले आहेत.

८ विशाल भवन अणि १० मंदिरे प्रार्थने साठी  तयार करन्यात आले आहे. जैन ग्रंथा मधे नालंदाच्या परिसरातील सुन्दर बागबगीचे ‘सूत्रकृतांग’ अणि ‘हस्तीयान’ यांचा उल्लेख आहे.

नालंदाची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथली नालंदा मधे रतनोदधि, रत्नासागर आणि रत्नरंजक अशी ही तिन मुख्य पुस्तकालये होती. यातील एक एक य ९ मजलि होते यात अनेक हजारो हस्तलिखित पुस्तके आणि अनेक छापील पुस्तके होती. यात काही दुर्लभ अशी पुस्तके अणि ग्रन्थ देखिल होते.

या विद्यालयात भारताच्या विविध क्षेत्रातून तसेच बल्की, कोरिया, जापान, चीन, तिबेट, इंडोनेशिया, श्रीलंका, फारस, तुर्की, अणि ग्रीक येथून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत. या विद्यालयात १०००० विद्यार्थी अणि १००० आचार्य  होते. संपूर्ण जगात तेव्हा नालंदाचा डंका होता.

का जाळले होते नालंदा विश्वविद्यालय. परन्तु तुर्किचा शासक बख्तियार खिलजी च्या वेडेपनामुले नालंदा उद्वस्त झाले. सांगण्यात येते की एकदा बख्तियार खिलजी खुप आजारी पडला त्याने सगळ्या हकीमां कडून इलाज करून घेतला पण त्याला काही बरे वाटेना म्हणून त्याची तब्बेत आणखीनच खालावत चालली तेव्हा कोणी एकाने त्याला नालंदा विद्यालयातील आयुर्वेद शाखेचे प्रमुख श्रीभद्र यांच्याकडून इलाज करून घेण्याचा सल्ला दिला.

परन्तु खिलजीला कोना हिन्दू कडून इलाज करून घेणे मंजूर नव्हते, त्याला ते अपमान कारक वाटत होते  म्हणून त्याने एक अट ठेवली मी कोणतेही औषध घेणार नाही.

मी कोणते औषध न घेता त्यांनी मला बर करून दाखवावे अन्यथा मी त्यांना मृत्यु दंड देइल. श्रीभद्रानी खिलजिची अट मान्य केली अणि त्यांनी खिलजीला एक कुरान अनुन दिले त्याची ठराविक पाने त्याला रोज वाचायला सांगीतली.

श्रीभद्रानी त्या पांनाना औषधी लावलेली कारण, यामुळ खिलजीच्या पोटात पांनाना लावलेली औषधी जाऊन तो बरा झाला परन्तु एका हिन्दू हकीमा कडून बरे होने त्याला पचले नाही.

हिन्दू हकीम मुस्लिम हकीमापेक्षा जास्त हुशार कसे म्हणून त्याने नालंदा वर आक्रमण केले. या आधी  पण नालंदा वर २ आक्रमने झालेली, पण त्यानंतर त्याचे पुनर्वसन झालेले.

परन्तु ११९९ ला खिलजी केलेल्या आक्रमना नंतर मात्र याचे  पुनर्वसन होऊ शकले नाही. खिलजीने  आक्रमण केल्या नंतर तेथील विद्यार्थी अणि आचार्यांना मारून टाकले. आणि महाविद्यालयाला आग लावून दिली. या आगीची भीषणता खुप होती त्यामुले हे महाविद्यालय कायम स्वरूपी नष्ट झाले.

नालंदा लागलेली आग ३ महिने जळत होती. यावरुनच आपल्याला अंदाज येऊ शकतो या विद्यालायत किती पुस्तके असतील. या आगीत खुप मौल्यवान हस्तलेख, ऐतिहसिक गोष्टी भस्मसात झाल्या.

असे म्हणतात काही आचार्यांनी कपड्यांमधे लपून काही हस्तलिखित पाण्डुलिपिंचे संरक्षण केले.विशेष म्हणजे हा लुटेरा २०० घोडेसवारांसोबत आला तेंव्हा विद्यालयात २०००० विद्यार्थी शिकत होते त्यांना कधी स्वप्नात पण वाटल नसेल आपल्याला संरक्षणाची गरज भासेल.

एका क्रूर तुर्क खिलजीच्या अंहमपणा मुळ आपण आपला खुप मोठा इतिहास हरवला. आज जर नालंदा अस्तिवात असते तर जगात भारताचा हात कोण पकडू शकल नसत. अश्या या अमूल्या वास्तुला आपण नक्कीच भेट दिली पाहिजे.

आपल्याला हि माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये सांगा. माहिती आवडल्यास शेयर करा आम्ही आपल्यासाठी अशीच अपरचित माहिती घेउन येणार आहोत.

Leave a Comment

You cannot copy content of this page