आपल्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना योग्य रित्या कार्य करण्यासाठी आपल्या शरीरात हार्मोनची पातळी संतुलित असणे खूप महत्त्वाचे असते. आपल्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स असतात, त्या सर्वांचे कार्यही वेगळे असते. शरीरात हार्मोन्सचे संतुलन नसल्यास त्यामुळे आपल्याला अनेक गंभीर समस्या आणि आजारांना सामोरे जावे लागू शकते.
शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी सकस आहार आणि चांगल्या जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे असते. आज आपण हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी कोण कोणत्या भाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे हे जाणून घेणार आहोत.
अश्वगंधा ह्या आयुर्वेदिक वनस्पतीच्या मुळ्यांची पावडर दुधात मिसळून प्यायल्याने हार्मोन्स संतुलित व्हायला मदत मिळते. अश्वगंधाचा आहारात समावेश केल्याने कॉर्टिसोलसारखे हार्मोन्स तयार व्हायला मदत मिळते. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे संयुग असते, ज्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि ते इस्ट्रोजेन सारख्या हार्मोन्सचे संतुलन करण्यास मदत करतात.
आपल्या शरीरातील हार्मोन्स संतुलित होण्यासाठी आपण मेथीचे दाणे पाण्यात भिजवून सेवन करू शकता. मेथी दाण्यांचे सेवन केल्याने निरोगी इन्सुलिन पातळी वाढवून हार्मोन्स संतुलित करण्यास मदत मिळते. शेवग्याची पाने आणि शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्याने हार्मोन्स संतुलन व्हायला मदत मिळते.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. जे हार्मोन्स संतुलित करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
आपल्याला हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी आहारात कोणकोणत्या भाज्यांचा समावेश केला पाहिजे. हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.