हंपी – भारतीय शिल्पकलेने नटलेला भव्यदिव्यगौरवशाली इतिहास

हंपी म्हणजे दक्षिणेकडील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक प्रसिद्ध ठिकाण. पाहताक्षणी प्रेमात पडावे असे वैभव या ठिकाणी पाहायला मिळते. हंपी हे शहर एकेकाळी विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध होती.

दक्षिणेकडील पर्यटन स्थळांपैकी हंपी हे सर्वात सुंदर पर्यटन स्थळ आहे. कर्नाटकमधील बेलोरी येथून अवघ्या 13 किलोमीटरच्या अंतरावर हंपी हे शहर विजयनगर साम्राज्याची गाथा घेऊन उभे आहे. इ.स. 1336 ते इ.स. 1565 हा विजयनगर साम्राज्याचा सुवर्णकाळ होता.

तुंगभद्रा नदीकाठी हरिहर आणि बुक्क या भावांनी स्थापन केलेल्या या शहरात अनेक सुंदर वास्तू अगदी कलापूर्ण पद्धतीने वसवलेल्या पहायला मिळतात. या ठिकाणी आपणास विरूपाक्ष, विठ्ठलस्वामी, रामस्वामी, कृष्णस्वामी ही मुख्य मंदिरे पाहायला मिळतात.

विठ्ठल मंदिर हे पूर्वाभिमुख आहे. या विठ्ठल मंदिराच्या पूर्व, दक्षिण व उत्तरेस गोपुरे पाहायला मिळतात. या मंदिरातील सर्वात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे संगीत स्तंभ. या मंदिरातील खांबांवर टिचकी मारली असता विभिन्न प्रकारच्या संगीताची निर्मिती होते.

याठिकाणी एकूण 56 स्तंभ आहेत. येथे असलेल्या शिला रथावरील शिल्पकाम हे अगदी पाहण्यासारखे आहे. अखंड दगडात असलेल्या या रथास भव्य चाक असल्याचे पहायला मिळतात.

हंपी शहरातील कमल महाल हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. हा कमल महाल वीट आणि चुना यांपासून बांधलेला आहे. या महालाचा रस्ता कमळाच्या फुलांच्या पाकळ्या सारखा आहे. या महाला जवळच हजारा राम मंदिर आहे.

विक्रमादित्य दुसरा यांची राणी लोकमहादेवी यांनी विरूपाक्ष मंदिर बांधले. हंपीमधील विरूपाक्ष मंदिर हे असे एकमेव मंदिर आहे जे आजही उपासनास्थळ म्हणून वापरले जाते. तसेच हंपीमध्ये अनेक प्रकारची कलापूर्ण मंदिरे पाहायला मिळतात.

हंपी या शहरास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. हंपी या शहरास फक्त भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून पर्यटक भेट देण्यासाठी येतात आणि येथील वैभवशाली इतिहासाचा अभ्यास करून इतिहास जपण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

You cannot copy content of this page