आयुर्वेदामध्ये हळद आणि दुध एकत्रित प्यायल्याने मिळणाऱ्या फायद्याविषयी सांगितलेलं आहे. हळद आणि दुध यामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्या परिपूर्ण म्हणून ओळखले जाते. हळदीमध्ये एंटीसेप्टिक आणि एंटी-बायोटिक गुणधर्म असतात.
आणि दुधाला कॅल्शियमचा चांगला स्रोत मानले. जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी एकत्र मिसळल्या जातात तेव्हा त्यांचे गुणधर्म आणखी वाढतात. हळद-दुधामध्ये कॅल्शियम, लोह, सोडियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे हळद दुध प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत व्हायला मदत मिळते.
रात्री झोपायच्या आधी कोमट दुधात हळद मिसळून प्यायल्याने त्यामध्ये असणाऱ्या अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे सर्दी, खोकला अशा आजारांपासून बचाव होतो.
कोमट दुधात हळद मिसळून प्यायल्याने त्यामध्ये असणाऱ्या कॅल्शिम घटकांमुळे आपली हाडे मजबूत होतात. सांधेदुखीचा त्रास असल्यास आपण हळद दुध अवश्य प्या. तसेच वाढत्या वयाच्या मुलामुलींना हळद दुध अवश्य प्यायला द्या. हळद दुध प्यायल्याने त्यांची बौद्धिक क्षमता आणि शरीर दोन्ही मजबूत होईल.
नियमित हळद दुध प्यायल्याने शरीरावरील जखम लवकर भरण्यास मदत मिळते. हळद दुध प्यायल्याने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होते. चेहऱ्यावर तेज येते. कोमट दुधात हळद मिसळून प्यायल्याने आपल्या त्वचेवरील काळे डाग कमी होतात, त्वचा उजळते, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
मा’सिकपाळी दरम्यान पोट दुखत असल्यास हळद दुध प्यायल्याने वेदना कमी व्हायला मदत मिळते. हळद दुध नियमित प्यायल्याने आपले केस दाट होतात, केसांमध्ये खाज येत असल्यास ती थांबते.
ज्यांना मुळव्याध असेल त्यांनी हळद दुध पिवू नये. आम्ही आपल्यासाठी नियमित महत्वपूर्ण माहिती पोस्ट करत असतो ती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.