हाडे निरोगी ठेवण्यासाठी आणि हाडांचे आजार टाळण्यासाठी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

वाढत्या वयाबरोबर हाडे कमकुवत होणे स्वाभाविक आहे. वयाच्या  तिशीनंतर हाडे कमकुवत होऊ लागतात. वाढत्या वयानुसार हाडांच्या मजबुतीची विशेष काळजी घेतली पाहिजे. अनेकदा आपण आपल्या हाडांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो.

हाडे आपल्या शरीराला एक रचना देण्याचे काम करत असतात. हाडे निरोगी ठेवण्यासाठी व हाडांचे आजार टाळण्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो ते आज आपण जाणून घेणार आहोत.

हाडांची घनता टिकून राहण्यासाठी नियमित सकस आहार घेणे गरजेचे असते. हाडे मजबूत करण्यासाठी आपल्या आहारात दूध आणि दुधाच्या पदार्थांच्या समावेश करा.

हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियमसोबत व्हिटॅमिन डी देखील आवश्यक असते म्हणूनच आपल्या आहारात काजू, बदाम, अक्रोड आणि मनुका यांसारख्या सुक्यामेव्याचा आहारात समावेश केल्याने त्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम ह्या पोषक घटकांमुळे हाडे मजबूत व्हायला मदत होते.

सकाळी मुठभर शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्याने शरीरामध्ये कॅल्शियम आणि लोह वाढायला मदत मिळते. सफरचंदात पॉलीफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटी-ऑक्सिडंट असतात, जे हाडे निरोगी ठेवण्यास मदत करतात.

म्हणूनच आपल्या आहारात सफरचंदाचा समावेश अवश्य करा. हिरव्या पालेभाज्या, तीळ, हरभरे, अंडे या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश केल्याने हाडे मजबूत व्हायला मदत मिळते.

सकाळी 30 मिनिटे कोवळ्या उन्हात चालल्याने आपल्या आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन डी आपल्याला त्यातून मिळू शकते.

आपल्याला हाडे निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याची माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page