हाडे मजबूत करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

अपुऱ्या पोषक घटकांचा आहारात समावेश तसेच व्यायामाचा अभाव यामुळे आपल्या हाडांवर परिणाम होऊन हाडे ठिसूळ होतात. शरीरात्तील हाडे बळकट करण्यासाठी योग्य तो पोषण आहार घेणे महत्त्वाचे आहे.

यासाठी कॅल्शिअम आणि मिनरल्सयुक्त अन्नपदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. ही समस्या मुख्यतः स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. आज आपण हाडे मजबूत करण्यासाठी सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

योग्य पोषक घटकांचा आहारात समावेश केल्याने हाडांना मजबुती मिळण्यास मदत होते. त्यामुळे हाडे निरोगी राहण्यासाठी दररोजच्या आहारामध्ये कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी युक्त पोषक तत्व असणाऱ्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.

आहारामध्ये प्रोटिन्स, मॅग्नेशियम, विटामिन के आणि जस्त यांचा समावेश असणारे आहार घेतल्यास हाडे ठिसूळ होत नाहीत. त्यामुळे ज्या ज्या पदार्थांमध्ये हे पोषक तत्व आहेत असे पदार्थ तुम्ही तुमच्या नियमितच्या आहारामध्ये घ्या.

हाडे मजबूत करण्यासाठी नियमित 5 ते 8 बदाम खा. 1 कप बदामांमध्ये 457 मिलीग्राम कॅल्शियम असते. बदामामध्ये प्रथिनेही भरपूर असतात. यामुळे हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. तसेच बदाम स्मरणशक्ती वाढविण्यात मदत करते.

हाडांना मजबुती आणण्यासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करा. तसेच हिरव्या पालेभाज्यांच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. मासे, अंडी या पदार्थांमुळे हाडांना मजबुती प्राप्त होते. त्यामुळे हे पदार्थ तुम्ही आवर्जून खाल्ले पाहिजेत.

हाडे मजबूत करण्यासाठी आपण अंजीर देखील खाऊ शकता. 1 अंजीरामध्ये 242 मिलीग्राम कॅल्शियम फायबर आणि पोटॅशियम असते.

फळामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व असतात. त्यामुळे रोजच्या आहारामध्ये एक तरी फळ खाणे हाडांच्या मजबुतीसाठी गरजेचे आहे. कडधान्य खाल्ल्यामुळे हाडांना अनेक पोषक घटक मिळतात. त्यामुळे आपल्या आहारात कडधान्यांचा समावेश करा.

सुकामेवा, मेथीचे दाणे, पालक भाजी, नाचणी अशा पदार्थांचा आहारात समावेश केल्यामुळे हाडांना मजबुती प्राप्त होते. या पदार्थामधून कॅल्शियम, प्रोटीन्स आणि अनेक पोषक घटक मिळतात. जे हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात.

आपल्या हाडांना  मजबूत करण्यासाठी पोषक आहाराबरोबरच व्यायामाची पण गरज असते. यासाठी आपल्या दिनचर्येमध्ये व्यायामाचा समावेश करा. जॉगिंग, किंवा वेट लिफ्टिंग, योगा करणे या सर्व गोष्टी हाडे मजबूत करतात.

आम्हाला आशा आहे कि हाडे मजबूत करण्यासाठी सोपे घरगुती उपाय हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगाल; ह्या माहितीविषयी आपल्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, अशीच माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा. पोस्ट नोटीफिकेशन सुरु करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या फॅमिली डॉ चा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page