शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता असेल तर हाडे कमकुवत होऊ शकतात?

आपल्या शरीरात असणाऱ्या हाडांमुळे आपल्या शरीराला आकार मिळतो, शरीरात असणाऱ्या हाडांमुळेच आपल्याला नीट उभ राहता येत, चालता येत, हाताने एखादी गोष्ट पकडता येते; एकंदरीत हाडांच्या सांगाड्यावर आपल्या शरीराची संपूर्ण रचना अवलंबून असते.

हाडांच्या मजबुतीसाठी आपल्या आहारात कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजे? हाडांच्या मजबुतीसाठी कोणत्या व्हिटॅमिनची गरज असते हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आपल्या शरीरात असणारी हाडे हि मुख्यत कॅल्शियम ह्या घटकापासून बनलेली असतात; आणि कॅल्शियम शोषण्यासाठी व्हिटॅमिन डी ची आवश्यकता असते.

म्हणूनच हाडे मजबूत करण्यासाठी आपण पुरेश्या प्रमाणात  कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डीयुक्त घटकांचे सेवन केले पाहिजे. आता आपण जाणून घेऊयात हाडांच्या मजबुतीसाठी आपल्या आहारात कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजे.

हाडांच्या मजबुतीसाठी आपल्या आहारात पिकलेल्या केळीचा समावेश असला पाहिजे केळीमध्ये पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम अशा पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते. हाडांच्या मजबुतीसाठी गायीचे दुध, दही, पनीर अशा दुग्धजन्य पदार्थांचा आपल्या आहारात समावेश असला पाहिजे.

सुक्यामेव्यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते म्हणूनच हाडांच्या मजबुतीसाठी आपण आपल्या आहारात बदाम, अक्रोड अशा सुक्यामेव्याचा समावेश केला पाहिजे.

हाडांच्या मजबुतीसाठी आपण सोयाबीनचा आपल्या आहारात समावेश करू शकता. पालेभाज्या ह्या  कॅल्शिअमचा उत्तम स्रोत असतात त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी आपण वेगवेगळ्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे.

जर आपण मांसाहार करत असाल तर हाडांच्या मजबुतीसाठी आपण अंडी, मटन, मासे अशा गोष्टींचा समावेश आहारात करू शकता. हाडांच्या मजबुतीसाठी आपण तीळाचा आपल्या आहारात समावेश करू शकता.

आहाराबरोबरच हाडांच्या मजबुतीसाठी नियमित सकाळच्या कोवळ्या उन्हात अर्धातास शारीरिक कसरत केली पाहिजे. कसरत करायचा कंटाळा येत असेल तर रोज किमान अर्धा तास सकाळी चालायचा व्यायाम करा.

आपल्याला हाडांच्या मजबुतीसाठी आपल्या आहारात कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजे? हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page