हात पाय थरथर कापत असतील तर अशावेळी काय करावे?

वय झाले म्हणून हात पाय थरथर कापतात असे नाही. तरुण वयातही ही समस्या अनेकांना होते. बऱ्याचवेळा या समस्येकडे लोक दुर्लक्ष करतात. असे न करता त्वरित या समस्येवर इलाज होणे आवश्यक आहे. सतत काम केल्याने शरीर थकून जाते. त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते.

रक्तदाब कमी झाल्याने, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने ही हात पाय थरथरु लागतात. मद्यपान करणं हे शरीरासाठी धोकादायकच असतं. अतिप्रमाणात मद्यपा’न केल्याने हात थरथरण्याची समस्या उद्भवू शकते. अशावेळी काही आपण कोण कोणते घरगुती उपाय करू शकतो याची माहिती आज आपण घेणार आहोत.

हात पाय थरथर कापत असतील तर त्वरित त्या व्यक्तीला ग्लासभर पाण्यात चमचाभर साखर साखर, थोडेसे मीठ घालून प्यायला द्यावे, मीठ साखर पाणी दिल्याने अंगात ताकद निर्माण होते. शरीरातील ऊर्जा कमी झाली असेल तर ती पुन्हा निर्माण होते. त्यामुळे अंगातील थरथराट कमी होतो.

मेंदूवर जास्त ताण दिल्याने बऱ्याच जणांचे हात पाय थरथर कापायला लागतात. अति तणाव घेतल्याने होत असलेला हात पायांचा थरथराट घालवण्यासाठी लिंबू पाण्यामध्ये साखर घालून  प्यावे. त्यामुळे मेंदू शांत होतो. याबरोबरच काही काळ शांततेत बसा. आपल्याला फरक जाणवेल.

हात पाय थरथर कापत असतील तर अश्यावेळी दीर्घ श्वास आत घ्या आणि काही सेकंद धरून ठेवा. नंतर तोंडाने श्वास सोडा. 2 मिनिट हि क्रिया आपल्याला करायचे आहे. असे केल्याने आपल्याला फरक जाणवेल.

नारळ पाणी हा अंगातील ताण कमी करण्यासाठी आणि हात पाय थरथरत असतील तर त्यावर उत्तम उपाय आहे. नारळ पाणी एका सलाईन प्रमाणे काम करते. हात पाय थरथर कापू नये यासाठी आठवड्यातून 2 वेळा तरी  राईच्या तेलाने मालिश करा. मालिश केल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत मिळते.

आपले हात पाय नेहमी थरथर कापत असतील तर आपण नियमितपणे एक ग्ल्लासभर दुधासोबत एक छोटी वाटी भर सोयाबीनच्या पाण्यात भिजवलेल्या वड्या खा. यामुळे आपल्याला पोषक घटक मिळतील. आणि आपले थरथरणे कमी येईल.

जास्त चिडचिड करणे, वेळेत न जेवणे, वेळेत न झोपणे यामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा येतो. अशक्तपणा येऊन हात पाय थरथरु लागतात. अशा वेळी योग्य वेळी आहार आणि झोप घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीर स्थिर राहते.

आपल्याला हात पाय थरथर कापत असतील तर अशावेळी काय करावे? हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा;  अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page